शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील कारंजाच्या डॉक्टरसह १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:14 IST

डॉक्टरसह १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने कारंजासह मानोरा तालुक्याला मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्दे मंगरूळपीर तालुक्यातील एक जण वर्ध्यात आढळला पॉझिटिव्ह अहवाल १० मे रोजी दुपारी निगेटिव्ह आल्याने कारंजेकरांना मोठा दिलासा मिळाला. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील एक मधूमेही रुग्ण कारंजातील एका खासगी रुग्णालयात ४ मे रोजी नियमित तपासणी करून गेला. या रुग्णाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे ६ मे रोजी अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे या रुग्णाची तपासणी करणाºया कारंजातील ‘त्या’ डॉक्टरसह १३ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल करून या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने ९ मे रोजी तपासणीसाठी  अकोला येथे पाठविले होते. या सर्वांचे अहवाल १० मे रोजी दुपारी निगेटिव्ह आल्याने कारंजेकरांना मोठा दिलासा मिळाला. नेर तालुक्यातील एक मधूमेही रुग्ण कारंजातील एका खासगी रुग्णालयात ४ मे रोजी नियमित तपासणी करून गेला. या रूग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचा आहवाल ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान प्राप्त झाल्यामुळे कारंजातील त्या डॉक्टरसह ९ व्यक्ती व कोरोनाबाधित रुग्णाचे कारंजातील ४ नातेवाईक अशा एकूण १३ जणांना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तपासणीअंती ९ मे रोजी या १३ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांचा तपासणी अहवाल १० मे रोजी दुपारी प्र्राप्त झाला असून, या सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली. दरम्यान, कारंजातील त्या खासगी डॉक्टरच्या संपर्कातील जवळपास २४० जण आल्याने या सर्वांची आरोग्य तपासणी ८ व ९  मे रोजी करण्यात आली होती. यापैकी कुणालाही कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. सुरक्षिततेसाठी या २४० जणांना घरातच राहण्याचा सल्ला दिला होता. आता त्या खासगी डॉक्टरसह १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने कारंजासह मानोरा तालुक्याला मोठा दिलासा मिळाला.दुसरीकडे मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील एक रुग्ण हा वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात कोरोनाबाधित असल्याचे १० मे रोजी दुपारी स्पष्ट झाले. त्यामुळे मंगरूळपीर तालुक्यात खळबळ उडाली असून, हा रुग्ण कुणाच्या संपर्कात आला का? याची माहिती घेतली जात आहे. हा रुग्ण उपचारासाठी ८ मे रोजी वाशिम जिल्ह्यातून सुरूवातीला अकोला येथे आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्यात गेला होता. माहितीचे संकलनमंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील रूग्ण सध्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे. त्याच्या संपर्कात कोण-कोण आले याची माहिती घेण्यासाठी आरोग्य पथक १० मे रोजी कवठळ येथे दाखल झाले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाcorona virusकोरोना वायरस बातम्या