शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : नागरिकांचा विनामास्क शहरात वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 18:49 IST

नागरिक  शहरातून फिरताना मास्कचा वापर करीत नाहीत हे लोकमतने ८ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आणले आहे.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरात कोरोना संसर्गाविषयी नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे अनेक प्रकार पाहावयास मिळतात. विनाकारण रस्त्यावर फिरणे, तोंडावर मास्क न बांधणे, विनाकारण गर्दी करणे अशा लोकांवर दंडात्मक कारवाईही केल्या जात आहे. तरी सुध्दा नागरिक  शहरातून फिरताना मास्कचा वापर करीत नाहीत हे लोकमतने ८ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आणले आहे. यामुळे प्रशासनाच्यावतिने करण्यात येत असलेली कारवाई कठोर व अधीक गतिमान करणे गरजेचे झाले आहे. कोरोना विषाणू (कोविड १९)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सीमाबंदी, संचारबंदी, फिजिकल डिस्टन्सिंग राखणे, मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यांतर्गत प्रशासनाने योजलेल्या उपायांचा भंग करणाºयांवर कारवाई करण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे. तरी सुध्दा काही नागरिक याचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. लोकमतच्यावतिने शहरात फिरुन सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाºयांचा शोध घेण्यात आला असता शहरातील प्रत्येक रस्त्यावर अनेकजण विना मास्क बिनधास्तपणे फिरतांना आढळून आले आहेत.जिल्हाधिकारी रुषिकेष मोडक यांच्या आदेशानुसार मास्क न वापरणाºयांवर २०० रुपये कारवाई करण्यात  येत आहे.  नगरपरिषदेच्यावतिने विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाºयांना २०० रुपये दंड पोलीसांमार्फत वसूुल केल्या जात आहे.दिवसभर पोलीस विभागाने दंड केल्यानंतर पोलीसांकडून नगरपरिषदेतील कर विभागाचे कर्मचारी जमा झालेला पैसा गोळा करुन शासनाच्या तिजोरीत जमा करीत आहेत.मास्क न वापरता कारवाईसाठी पोलीस विभागाच्या कर्मचाºयांसह नगरपरिषदेचे कुणाल कनोजे, संतोष किरळकर , हडपकर व पोलीस विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

- कारवाईची मोहीम कडक करणे गरजेचेवाशिम नगरपरिषदेच्यावतिने मास्क न वापरणाºयांवर कारवाई केल्या जात आहे. आजपर्यंत शेकडो जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्याचे अािध्कार पोलीस कर्मचारी यांना देण्यात आले असून दररोज केल्या जात असलेल्या कारवाईतून आलेली रक्कम नगरपरिषदेचे कर्मचारी गोळा करीत आहेत. कारवाई केल्या जात असतांना काही नागरिक शहरात बिनधास्तपणे विना मास्क फिरत आहेत. यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

मास्कचा वापर न करणाºया व्यक्तिवर २०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर निघतांना मास्क वापरणे आवश्यक आहे. जे व्यक्ती मास्कचा वापर करुन निघणार नाहीत त्यांच्यावर अधिक कडक कारवाई केल्या जाणार आहे. नागरिकांनी आपले व आपल्या शहरातील नागरिकांचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवण्याकरिता सहकार्य करावे.-दीपक मोरेमुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या