शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : नागरिकांनो, सुरक्षितता बाळगा - हृषीकेश मोडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:45 IST

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यासह देशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या तुलनेत मात्र वाशिम जिल्ह्यात गत २२ दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळला नाही. तसेच मेडशी येथील एकमेव कोरोनाबाधीत रुग्णाचा अंतीम अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. कौतुकास्तपद बाब म्हणजे केंद्र सरकारने २१ एप्रिल रोजी राज्यातील चार जिल्ह्यांनी राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व केलेल्या उत्कृष्ट अंमलबजावणीबाबत कौतूक केले. त्यात वाशिम जिल्ह्याचा समावेश होता. या विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद...

जिल्ह्यात ‘कोरोना’ला प्रतिबंधासाठी कुठल्या उपाययोजना राबविल्या?कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी विविध स्वरूपातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमा तत्काळ बंद करून जिल्ह्यात विनापरवाना दाखल होणारी वाहने व नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कायदा मोडणाºया अनेकांची वाहने जप्त करण्यात आली. गावपातळीवर ग्रामस्तरीय समिती स्थापन करून परराज्य, महानगरातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलीत करण्यात आली. त्यानुसार, नागरिकांची आरोग्य विभागातर्फे तपासणी करून संदिग्ध असल्यास १४ दिवस घरातच अलगीकरण करून राहण्याचा सल्ला संबंधितांना देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले.

परजिल्ह्यातून किती मजूर परतले?रोजगारासह विविध कारणांमुळे महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार ५०९ कामगार, मजूर हे ३१ मार्चपर्यंत आपापल्या गावी परतले आहेत. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. संबंधितांचा ‘होम क्वारेंटिन’ कालावधी संपुष्टात आला असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे, पण या नागरिकांनी यापुढेही आरोग्यासंदर्भात खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोरोना सुरक्षेसंबंधी नागरिकांना काय संदेश द्याल ?मेडशी (ता. मालेगाव) येथील एकमेव कोरोना बाधित व्यक्तीचा अंतीम थ्रोट स्वॅब अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असून त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. ही जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. असे असले तरी आगामी काही दिवसांत ‘कोरोना’चा शिरकाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून नागरिकांनी त्याचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतcorona virusकोरोना वायरस बातम्या