शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘कोविड केअर सेंटर’मध्ये २४६४ रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:52 IST

दोन दिवसात सर्दी, ताप व खोकला असणाऱ्या एकूण २४६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्दे २४ एप्रिल रोजी सायंकाळपर्यंत ७०० च्या आसपास रुग्ण तपासण्यात आले.सहा ‘कोविड केअर सेंटर’ २२ एप्रिलपासून सुरु करण्यात आली.

- संतोष वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सहा स्वतंत्र ‘कोविड केअर सेंटर’ २२ एप्रिलपासून सुरु केले असून, २२ व २३ एप्रिल अशा दोन दिवसात सर्दी, ताप व खोकला असणाऱ्या एकूण २४६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. २४ एप्रिल रोजी सायंकाळपर्यंत ७०० च्या आसपास रुग्ण तपासण्यात आले.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेला एकमेव रुग्णही बरा झाला आहे. परंतू यापुढेही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ताप, सर्दी व खोकला हे तसे नेहमीचे आजार आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसणाºया व्यक्तींची तपासणी व उपचार करण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे सहा ‘कोविड केअर सेंटर’ २२ एप्रिलपासून सुरु करण्यात आली. याठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण व साहित्य, औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ज्या नागरिकांना ताप, सर्दी व खोकला असा त्रास आहे, त्यांनी उपचारासाठी इतर कुठेही न जाता आपल्या नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्येच येवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २४ एप्रिल रोजी केले.

असे आहेत तालुकानिहाय ‘कोवीड केअर सेंटर’वाशिम तालुका : अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा, हिंगोली रोड, सुरकंडीरिसोड तालुका : अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा, सवडमालेगाव तालुका : नवीन तहसील कार्यालय, मुख्य इमारत, मालेगावमंगरूळपीर तालुका : अल्पसंख्याक वसतिगृह, मंगरूळपीरकारंजा तालुका : एम.बी. आश्रम, मुतीर्जापूर रोड, झाशी राणी चौक जवळ, चंदनवाडीमानोरा तालुका : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मानोरा

सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णसेवाताप, सर्दी व खोकला आदी लक्षणे दिसणाºया व्यक्तींची तपासणी, उपचार करण्यासोबतच त्यांच्या प्रवासाची नोंद सुद्धा या कोविड केअर सेंटरमध्ये घेतली जात आहे. २२ एप्रिलपासून रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोविड केअर सेंटर सुरु असतात, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले.

कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानंतर होणाºया कोविड-१९ आजाराच्या लक्षणांमध्ये सुद्धा ताप, सर्दी व खोकला या लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे असा त्रास असलेल्या रुग्णांची स्वतंत्र तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार करणे यासाठी प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. दोन दिवसात २४६४ जणांची तपासणी केली.-डॉ. अविनाश आहेर, डीएचओ

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या