शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कात मंगरूळपीरचे २१ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 10:55 IST

खबरदारीचा उपाय म्हणून या २१ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १९ मे रोजी पाच जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका कोरोनाबाधित रुग्णासोबत मंगरूळपीर येथील २१ जणांनी प्रवास केल्याची बाब समोर आली. खबरदारीचा उपाय म्हणून या २१ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून, सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला पाठविण्यात आले. जिल्ह्यात एकूण २९ संदिग्ध रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. दरम्यान, मालेगाव येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील ४ वर्षीय मुलाचा अहवाल २० मे रोजी निगटिव्ह आला.इतर जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी ठेवण्यात जिल्हा प्रशासनासह आरोग्य व पोलीस यंत्रणेने यश मिळविले होते. अलिकडच्या काळात परराज्यातून येणाऱ्या मजूर, कामगारांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची तसेच संदिग्ध रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. मालेगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील पाच जण कोरोनाबाधित असल्याचे १९ मे रोजी निष्पन्न झाले. या महिलेच्या संपर्कातील एका मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका जणाला कोरोनासंसर्ग झाल्याचे १९ मे रोजी स्पष्ट झाले. या रुग्णाच्या संपर्कात मंगरूळपीर येथील तब्बल २१ जण आले आहेत. त्या कोरोनाबाधित रुग्णासोबत प्रवासादरम्यान मंगरूळपीर येथील २१ जण संपर्कात आल्याची खात्री पटल्याने आरोग्य विभागाने १९ मे रोजी सात आणि २० मे रोजी १४ अशा एकूण २१ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले. या नमुन्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. दरम्यान, या घटनेपासून आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून या २१ जणांच्या संपर्कात अजून कोण कोण आले याची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले. आर्वी (जि. वर्धा) येथील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात मंगरूळपीर येथील २१ जण आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना क्वारंटीन केले असून, त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला पाठविण्यात आले. त्याचा अहवाल सध्या प्रलंबित आहे.- डॉ. अंबादास सोनटक्के,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.

रिसोड तालुक्यातही दोन संदिग्ध रुग्ण रिसोड तालुक्यात परजिल्हा, परराज्यातून येणाºया कामगार, मजुरांची संख्या अधिक आहे. या तालुक्यात दोन जण संदिग्ध आढळून आले असून, त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMangrulpirमंगरूळपीरwashimवाशिम