शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : २८ दिवसांत २० हजार नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 17:27 IST

Washim News  ७ फेब्रुवारी ते ६ मार्च या २८ दिवसांच्या कालवधीत २० हजार ११५ स्त्राव नमुन्यांची तपासणी केली.

वाशिम : कोरोनाबाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, वाशिम येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (आरटी-पीसीआर लॅब)  ७ फेब्रुवारी ते ६ मार्च या २८ दिवसांच्या कालवधीत २० हजार ११५ स्त्राव नमुन्यांची तपासणी केली.जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या सुद्धा वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात संकलित केलेले स्त्राव नमुन्यांची लवकरात लवकर तपासणी करण्यासाठी वाशिम येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील (आरटीपीसीआर लॅब) अधिकारी, कर्मचारी मेहनत घेत आहेत. दोन शिफ्टमध्ये प्रयोगशाळेचे कामकाज सुरु असून ७ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत २० हजार ११५ स्त्राव नमुने प्रयोगशाळेत तपासले गेले. १० आॅक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वाशिम येथील आरटी-पीसीआर प्रयोगशाळेचे आॅनलाईन स्वरुपात औपचारिक उद्घाटन झाले. सुरुवातीचे काही दिवस प्रयोगशाळेत दिवसाला ३०० नमुन्यांची तपासणी होत होती. त्यानंतर ही क्षमता टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात आली असून आता दिवसला सरासरी १२०० नमुन्यांची तपासणी केली जात आहे. प्रयोगशाळेमध्ये प्राप्त होणारे नमुने वेळेत तपासून त्याचे अहवाल तातडीने देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या मार्गदर्शनात व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी डॉ. किशोर लोणकर व डॉ. बालाजी हरण यांच्या नेतृत्वात कोरोना योद्ध्यांची टीम सज्ज असून दोन शिफ्टमध्ये प्रयोगशाळेचे कामकाज सुरु आहे. प्रयोगशाळेत आतापर्यंत एकूण ६७ हजार ४५७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. गेल्या २८ दिवसाच्या कालावधीतील आरटी-पीसीआर चाचण्यांचा विचार करता अमरावती विभागात वाशिम जिल्हा क्रमांक दोनवर आहे. ७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान पहिल्या सप्ताहात १५३१ नमुने तपासले गेले, टप्प्या-टप्प्याने यामध्ये वाढ होवून २८ फेब्रुवारी ते ६ मार्च या सप्ताहात ८ हजार ७४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या