शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आणखी २० पॉझिटिव्ह;  रुग्ण संख्या २३७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 17:32 IST

कोरोनाबाधितांची संख्या आता २३७ वर पोहोचली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत २० रुग्णांची वाढ झाली आहे.   त्यामुळे जिल्ह्याती कोरोनाबाधितांची संख्या आता २३७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रकच्या क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला. त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. मे महिन्याच्या अखेरीस परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात परतले. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शतक ओलांडले. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे आदी लक्षणे असणाºया रुग्णांचेदेखील स्वॅब घेण्याची व्यवस्था तालुकास्तरावर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. १ ते १२ जुलै या ११ दिवसात तब्बल १२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात गेल्या १८ तासांत ३२ रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी रात्री उशिरा १२ लोकांचा कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आला, तर रविवारी दुपारपर्यंत त्यात २० रुग्णांची भर पडली. शनिवारी रात्री प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार वाशिम शहरातील गंगुबाई प्लॉट परिसरातील ०५, हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ०४, मालेगाव शहरातील अकोला नाका परिसरातील ०१ आणि कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ०२ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्याशिवाय रविवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार सुंदरवाटिका (वाशिम) परिसरातील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच कामरगाव (ता. कारंजा लाड) येथील २ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, रविवारी दुपारीच रिसोड तालुक्यातील १४ जणांचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २३७ वर पोहोचली असून, त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला, तर १०५ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या