शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी १३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 18:35 IST

अहलावानुसार जिल्ह्यातील १३ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतच असून, सोमवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालासह मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील १३ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात कारंजा लाड येथील ९, हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील एक, मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील दोन आणि शेलुबाजार येथील एका महिलेचा कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६७ झाली असून, त्यापैकी ५५ जण उपचाराखाली आहेत.  सोमवारी रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामध्ये कारंजा लाड येथील ३८ व ४८ वर्षीय महिला, ३३ व ५८ वर्षीय पुरूष व दोन ६ वर्षीय मुली अशा एकूण ६ व्यक्तींचा समावेश होता. हे सर्वजण कारंजा येथील गांधी चौक येथील कोरोना बाधितांच्यानजिकच्या संपर्कातील आहेत. त्याशिवाय  हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील २९ वर्षीय युवकही कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर युवक विरार, मुंबई येथून आला असून, तेथे कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता. मंगळवारी सकाळी शेलुबाजार येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ती कोरोनाबाधित वृद्धाची मुलगी आहे, तसेच मालेगाव तालुक्यातील राजुरा येथे कल्याण, मुंबई येथून परतलेल्या कुटुंबातील चौघांपैकी पुरुष आणि मुलगा मिळून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर सायंकाळी प्राप्त अहवालानुसार कारंजा येथील  माळीपुरा, कारंजा लाड येथील  ३ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये दोन ३६ वर्षीय पुरुष व एका २५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. हे सर्वजण कारंजा शहरातील कोरोना बाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहेत.                       

नागरिकांच्या तपासणीसाठी जिल्ह्यात ८० पथके जिल्ह्यात ज्या व्यक्तीचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्या व्यक्तींच्या हायरिस्क संपर्कातील लोकांना आयसोलेनशन कक्षात दाखल करून त्जयांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेतच. शिवाय कोरोनाबाधितांचे संबंधित गाव कन्टेनमेंट झोन जाहीर करून त्यागावातील सर्व नागरिकांची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येत. सद्यस्थितीत अशा गावांत आरोग्य विभागाच्या प्रत्येकी दोन व्यक्तींचा समावेश असलेली ८० पथके विविध ठिकाणी नागरिकांची तपासणी करीत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम