शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 10:56 IST

Corona's death graph slide down in Washim : १ ते ८ जुलै या कालावधीत केवळ तिघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर घेण्यात आली आहे.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत चालली आहे. यासह कोरोनाने होणाऱ्या मृत्यूच्या संख्येतही परिणामकारक घट झाली असून १ ते ८ जुलै या कालावधीत केवळ तिघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर घेण्यात आली आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये शिरकाव केला. तेव्हापासून १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बाधितांचा एकूण आकडा ७ हजार ३३४ वर पोहोचला होता. यासह संसर्गाने १५६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर घेण्यात आली होती. दरम्यान, साधारणत: १५ फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आली. पहिल्या लाटेच्या तुलनेत ती अधिक तीव्र स्वरूपाची ठरली. तेव्हापासून ८ जुलै २०२१ पर्यंत तब्बल ३४ हजार १९७ नवे रुग्ण निष्पन्न झाले. संसर्गाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढले. १४ फेब्रुवारीपर्यंत १५६ वर असलेला मृत्यूचा आकडा ४६६ ने वाढून आजमितीस ६२२ वर पोहोचला आहे. असे असले तरी १ ते ८ जुलै या कालावधीत कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या केवळ तीन असून संसर्गाने बाधितांच्या प्रमाणातही गेल्या काही दिवसांत लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

१७ खासगी रुग्णालयांतील कोरोना रुग्ण शून्यावरकोरोनाकाळात संसर्गाने बाधित होणाऱ्यांवर वेळीच उपचार व्हावेत, त्यांची गैरसोय होऊ नये आणि आरोग्य विभागावरही ताण येऊ नये, यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून १७ खासगी रुग्णालयांमधील कोरोना रुग्णसंख्याही शून्यावर आली आहे. त्यामुळे ही रुग्णालये आता नाॅन कोविड रुग्णांसाठीही खुली करून देण्यात आली आहेत.केवळ १२९ जणांवर उपचार सुरु कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गेल्या काही दिवसांपासून बहूतांशी निवळत चालल्याची स्थिती आहे. आजमितीस एकूण बाधितांचा आकडा ४१ हजार ५४६ असला तरी ४० हजार ७९४ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या केवळ १२९ जणांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या