शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धास्ती; भोजनासाठी ग्राहक रेस्टॉरंटकडे फिरकेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 12:09 IST

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, नागरिकांनीदेखील सावधगिरीचा पवित्रा घेतल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात हॉटेल्स्, लॉज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास २ सप्टेंबरपासून परवानगी मिळाली आहे. सुरूवातीच्या दोन्ही दिवसात हॉटेल्स्मध्ये न जाणेच ग्राहकांनी पसंत केल्याचे जिल्ह्यात दिसून आले. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, नागरिकांनीदेखील सावधगिरीचा पवित्रा घेतल्याचे दिसून येते.साधारणत: मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. तेव्हापासून हॉटेल्स्, लॉज पूर्णत: बंद आहेत. पाच महिन्यांपासून हॉटेल्स् बंद असल्याने व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडले. अर्थचक्र सावरण्यासाठी देशात ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू असून, २ सप्टेंबरपासून ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात हॉटेल्स् व लॉज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पूर्ण तयारीनिशी हॉटेल्स् व लॉज व्यावसायिक हे ग्राहकांच्या सेवेत सज्ज झाले. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकही सावधगिरीचा पवित्रा घेत असल्याचे दिसून येते. भोजनासाठी हॉटेल्सचे दरवाजे खुले झाले असले तरी २ व ३ सप्टेंबर रोजी हॉटेल्समध्ये फारसे ग्राहक गेले नसल्याचे दिसून आले.यासंदर्भात शहरातील हॉटेल व्यावसायिक पंकज गिते, डॉ. दीपक शेळके, जसविंदर सिंग जोहर, पंकज मिनोचा यांच्याशी संपर्क साधला असता, हॉटेल्समध्ये फारसे ग्राहक येत नसल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या दोन दिवसात हॉटेलमध्ये शुकशुकाट दिसून आला.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९३८ वर गेली आहे. वाशिम शहरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सावधगिरीचा प्रयत्न म्हणून हॉटेल व लॉजमध्ये जाणे नागरिक टाळत असल्याचे दोन दिवसात दिसून आले. आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाहॉटेल्स, लॉज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देताना, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार निर्जंतुकीकरण, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन म्हणून काही अंतरावर आसन व्यवस्था करण्यात आली. परंतू, कोरोनाची धास्ती असल्याने सुरूवातीच्या दोन दिवसात हॉटेलमध्ये न जाणे ग्राहकांनी पसंत केल्याचे दिसून आले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेल