शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त ग्रामपंचायतींना मिळणार लाखोंची बक्षिसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 12:07 IST

Coronafree Gram Panchayats will get lakhs of prizes : पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्यांद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण राज्य या संकटातून बाहेर पडावे, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजनेची आखणी करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होऊन महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोविड संसर्ग तुलनात्मकदृष्ट्या जास्त प्रमाणात होण्याचा धोका वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कोविडसंबंधी चाचण्या होणे व गावातच संस्थात्मक विलगीकरणाच्या नियमाची चोख अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सर्दी, ताप, खोकला, हगवण, डोकेदुखी, मधुमेह, अशक्तपणा, फुप्फुसांचे आजार असणाऱ्या रुग्णांना तातडीने कोविड तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, येत्या काळात लहान मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करणे, तसेच पिण्याचे पाणी, शौचालय, पंखे, आदी सुविधा असलेल्या इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी निश्चित करणे, अशा इमारतींमध्ये किमान १० बेडची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने ‘कोरोनामुक्त गाव पुरस्कार’ योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwashimवाशिम