शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus in Washim : बालकांसाठी १२५ खाटांची स्वतंत्र सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 11:53 IST

Separate facility of 125 beds for children : लहान मुलांना अधिक धोका होण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत त्यादृष्टीने सज्जता करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे, तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका होण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत त्यादृष्टीने सज्जता करण्यात येत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचारासाठी १०० खाटांची स्वतंत्र सुविधा, तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथेही लहान मुलांसाठी २५ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला.तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी सर्व सोयी-सुविधायुक्त स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात आली. बालकांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची जबाबदारीदेखील निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये १०० खाटांची, तर कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे २५ खाटांची स्वतंत्र सुविधा उपलब्ध केली आहे. लहान मुलांच्या कक्षामध्ये खेळणी, सायकल, दूरचित्रवाणी संच यासारखी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली असून, भिंतीवर विविध कार्टून लावण्यात आली आहेत. यामुळे लहान मुलांच्या मनातील भीती दूर  करण्याचा प्रयत्न केला जाईल.

आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण -डॉ. राठोडकोरोनाबाधित लहान मुलांसाठी तयार असलेल्या विविध कक्षांमधील सर्व खाटांना सेंट्रल पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, तसेच नवजात शिशू अतिदक्षता विभागात ६ इनक्युबेटर, लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात १० व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ६ बालरोगतज्ज्ञ व १२ स्टाफ नर्सेससह आरोग्य कर्मचाऱ्यांचा चमू याठिकाणी नियुक्त केला जाणार असून, सर्वांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे, पूर्वतयारी करण्यात आली, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या