शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : २३ दिवसात ८८ जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 10:54 IST

३ ते २६ जून या २३ दिवसात ८८ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९६ वर पोहचली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मे महिन्याअखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ८ कोरोनाबाधित रुग्ण होते. ३ ते २६ जून या २३ दिवसात ८८ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९६ वर पोहचली. वाशिम शहरातही आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. दरम्यान, २७ जून रोजी मंगरूळपीर येथील बिलाल नगर परिसरातील एक जण अकोल्यात पॉझिटिव्ह निघाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून सदर परिसर सील करण्यात आला.मे महिन्यापर्यंत अन्य जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मर्यादीत होती. जून महिन्याच्या ३ तारखेपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याने थोडाफार दिलासाही आहे. आतापर्यंत ९६ पैकी ६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर दोघांचा मृत्यू झाला. उर्वरीत ३० जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. २७ जून रोजी जवळपास ४० जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला पाठविण्यात आले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी वाशिम येथील महिला अकोल्यात पॉझिटिव्ह आढळली होती. या महिलेच्या संपर्कातील दोन, तीन जणांचे थ्रोट स्वॅब नमुने अकोल्यात तातडीने घ्यावी, यासंदर्भात अकोल्याच्या आरोग्य विभागाशी शनिवारी चर्चा झाली, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.मंगरूळपिरचा एक जण अकोल्यात पॉझिटिव्हमंगरूळपीर शहरातील बिलाल नगर परिसरातील एक जण अकोला येथे उपचारार्थ दाखल होता. या व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल २७ जून रोजी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी बिलाल नगर मंगरुळपीर येथे मनाई हुकूम आदेश लागू केले. २७ जूनपासून पुढील आदेशापर्यंत या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

३१ जणांचे स्वॅब घेणारकोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल २६ जूनला रात्रीदरम्यान पॉझिटिव्ह आले. या सहा जणांच्या ’हाय-रिस्क’ संपर्कात एकूण ३१ जण आल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी २८ जणांना शनिवारी क्वारंटीन केले तर तीन जणांना रविवारी क्वारंटीन केले जाणार आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील एका जणाचा कोरोना चाचणीचा अहवाल शनिवारी अकोल्यात पॉझिटिव्ह आला आहे. पुढील खबरदारीचा उपाय म्हणून मंगरूळपीर येथील त्या भागात आरोग्य विभागातर्फे पुढील १४ दिवस आरोग्य तपासणी व सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण ३० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या