शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

CoronaVirus in Washim : ७२ हजार नागरिक ‘क्वारंटीन’मुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:01 IST

एकूण ७८३५२ पैकी ७२८४० नागरिकांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला असून, आता केवळ ५५१२ नागरिक ‘क्वारंटीन’ आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात परतलेले ३१ हजार आणि लॉकडाऊननंतर ते ८ जूनपर्यंत परतलेल्या ४७३५२ अशा एकूण ७८३५२ पैकी ७२८४० नागरिकांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला असून, आता केवळ ५५१२ नागरिक ‘क्वारंटीन’ आहेत. दरम्यान, परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असल्याने अशा नागरिकांवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचा विशेष वॉच राहणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाने मार्च महिन्यापासून देशासह राज्यात धुमाकूळ घातला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन लावला. लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसांमध्येच वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात २७ हजार आणि शहरी भागात ४ हजार असे एकूण ३१ हजार मजूर दाखल झाले होते. या नागरिकांना होम क्वारंटीन केले होते. यापैकी एकालाही कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाल्याने १४ दिवसानंतर त्यांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर २४ मार्च ते ८ जून २०२० या कालावधीत ४७ हजार ३५२ नागरिक जिल्ह्यातील विविध गावांमध्ये परतले. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस क्वारंटीन केले. यापैकी ४१८४० नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपला असून, सध्या ५५१२ नागरिक क्वारंटीन आहेत. दुसºया टप्प्यात वाशिम तालुक्यात ६२६१ नागरीक परतले. यापैकी ५९८१ जण क्वारंटीनमुक्त झाले असून, सध्या २८० नागरिकांना क्वारंटीन आहेत. कारंजा तालुक्यात५८५३ नागरीक परतले. यापैकी ४३३४ जण क्वारंटीनमुक्त असून, १५१९ नागरिकांना क्वारंटीन आहेत.मालेगाव तालुक्यात ६९४३ नागरीक परतले. यापैकी ४७२० जण क्वारंटीनमुक्त असून, २२२३ नागरिकांना क्वारंटीन आहेत. मंगरूळपीर तालुक्यात ५७६४ नागरीक परतले. यापैकी ५२३० जण क्वारंटीनमुक्त असून, ५३४ नागरिक क्वारंटीन आहेत.रिसोड तालुक्यात १३७७६ नागरीक परतले आहेत. यापैकी १३०८८ नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला असून, सध्या ६८८ नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नागरीक रिसोड तालुक्यात परतले असून, तेथे विशेष दक्षता घेतली जात आहे. मानोरा तालुक्यात २६८ जण क्वारंटीनमानोरा तालुक्यात ७५५ नागरीक परतले आहेत. यापैकी ८४८७ नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला असून, सध्या २६८ नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे.कठोर अंमलबजावणीक्वारंटीन असलेल्या नागरिकांनी गावात फिरू नये अन्यथा गुन्हे दाखल केली जातील, असे निर्देश असून याची अंमलबजावणी सुरू असल्याने बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या