शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : अखेर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 11:58 IST

Corona Vaccine: प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमानुसार ‘ऑन स्पॉट’ नोंदणीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  सव्वा महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना १९ जूनपासून जिल्ह्यातील ३३ केंद्रांत कोरोना प्रतिबंधक लस देण्याला सुरुवात झाली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमानुसार ‘ऑन स्पॉट’ नोंदणीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या महिन्यात जनजीवन प्रभावित झाले होते. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला जेमतेम १० दिवस होत नाहीत, तोच लसींचा तुटवडा असल्याचे कारण समोर करून शासनस्तरावरून या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जिल्ह्यात ३२ हजार ९१९ कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १९ हजारांवर रुग्ण हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत. कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. सव्वा महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसी करणाला जिल्ह्यात १९ जूनपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ३३ केंद्रांत हे लसीकरण करण्यात येत असून, या सर्व केंद्रांत ३० ते ४४ वयोगटातील लाभार्थी ‘ऑन स्पॉट’ नोंदणी करून लस घेऊ शकतात. प्रथम येणाऱ्या लाभार्थीस प्राधान्य राहील, तसेच केंद्रावर उपलब्ध असलेल्या लसीच्या डोसनुसार लसीकरण करण्यात येईल. ३० ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थींना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जात आहे.

१९ जूनपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. लसीकरण हा कोरोनावर प्रभावी उपाय आहे. लस ही पूर्णत: सुरक्षित असून प्रत्येक नागरिकांने कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता लस घ्यावी. एकाच प्रकारच्या लसीचा हट्ट न धरता उपलब्ध लस घ्यावी. - डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम