शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : दोन्ही लसी परिणामकारकच; पण कोविशिल्डला अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:36 IST

Corona Vaccine: आतापर्यंत १ लाख ७७ हजार १०४ जणांनी कोविशिल्ड, तर १ लाख ३ हजार ५३१ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. परंतु परदेशात जाण्यास परवानगी असलेली कोविशिल्ड लस घेण्याला अनेकांची पसंती असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आतापर्यंत १ लाख ७७ हजार १०४ जणांनी कोविशिल्ड, तर १ लाख ३ हजार ५३१ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.देशात मार्च २०२०पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण कोरोनाबाधित रुग्ण ७१४३ होते, तर एकूण १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारांवर रुग्ण आढळून आले. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. आता दुसरी लाट ओसरत असताना, संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी परिणामकारक व सुरक्षित असून, उपलब्ध लसीनुसार पात्र नागरिकांना लस देण्यात येत आहे. तथापि, कोविशिल्ड लस घेण्याला अनेकांची पसंती मिळत असल्याचे दिसून येते. परदेशात जाण्यास परवानगी, लस घेतल्यानंतर फारसा त्रास न जाणवणे आदी कारणे समोर करून अनेकजण कोविशिल्ड लस घेत असल्याचे दिसून येते. कोविशिल्डसाठी वेळप्रसंगी वेटिंगवरही राहण्याची अनेकांची तयारी आहे.

एकाच लसीचा आग्रह धरू नये !कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी प्रभावी व परिणामकारक आहेत. दोन्ही लसी पुर्णत: सुरक्षित असून, पात्र नागरिकांनी कोणत्याही एका विशिष्ट लसीचा आग्रह धरू नये. उपलब्धतेनुसार लस घ्यावी. कोणत्याही अफवा, गैरसमजावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

कोविशिल्डसाठी सांगितली जाणारी कारणे !

  • परदेशात जाण्यासाठी कोविशिल्ड लस घेतल्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते.
  • लस घेतल्यानंतर फारसा त्रास होत नाही.
  • अधिक प्रमाणात परिणामकारक आहे.
  • शहर, ग्रामीण भागातील केंद्रात सहज उपलब्ध होते.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी परिणामकारक व प्रभावी आहेत. लसीबाबत कोणताही भेदभाव न करता उपलब्धतेनुसार पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.- डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम