शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भागात कोरोना ठाण मांडून; चार दिवसात ११६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 12:45 IST

यापैकी ११६ रुग्ण हे शहरी भागातील तर ७४ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आॅगस्ट महिन्यात चार दिवसात तब्बल १९० रुग्णांची भर पडली. दरम्यान यापैकी ११६ रुग्ण हे शहरी भागातील तर ७४ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली ७८५ पैकी  ४८८ रुग्ण हे शहरी भागात आढळून आले आहेत. त्यामुळे शहरवासियांची चिंता वाढली असून, वाशिम व कारंजा या दोन शहरात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १ ते ४ आॅगस्ट या चार दिवसात १९० रुग्ण वाढले आहेत. १  आॅगस्ट रोजी २६, २ आॅगस्ट रोजी ४१, ३ आॅगस्ट रोजी ९१ आणि ४ आॅगस्ट रोजी ३२ असे एकूण १९० रुग्णांची भर पडल्याने आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८५ वर पोहचली आहे. या चार दिवसात ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. १ आॅगस्ट रोजी शहरी भागात २१ तर ग्रामीण भागात ५, २ आॅगस्ट रोजी शहरी भागात ३३ तर ग्रामीण भागात ८, ३ आॅगस्ट रोजी शहरी भागात ५४ तर ग्रामीण भागात ३७ आणि ४ आॅगस्ट रोजी शहरी भागात ८ तर ग्रामीण भागात २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. १ एप्रिल ते ४ आॅगस्ट या दरम्यान जिल्ह्यात एकूण ७८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, यामध्ये शहरी भागातील ४८८ तर ग्रामीण भागातील २९७ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ४५९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ३०८ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. ४५९ जणांची कोरोनावर मातएकिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. ७८५ रुग्णांपैकी आतापर्यंत ४५९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ३०८ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या