शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

Corona Positive Story :  १०१ वर्षाच्या आजीबाईची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 11:58 IST

Corona Positive Story : १०१ वर्षाच्या जयवंताबाई गंगाराम रंजवे (रा. भोकरखेडा ता. रिसोड) या आजीबाईने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

- विवेकानंद ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्करिसोड : वय वर्षे १०१, सीटी स्कोर १२, दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली, अशा विपरित परिस्थितीतही आजीबाईने आत्मविश्वास, जिद्दीने कोरोनाविरूद्ध लढा दिला; सोबतीला डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि कुटुंबाचे मानसिक पाठबळ होतेच. या बळावर १०१ वर्षाच्या जयवंताबाई गंगाराम रंजवे (रा. भोकरखेडा ता. रिसोड) या आजीबाईने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातच उपचार घेतले.एकिकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. ज्येष्ठ नागरीक, सीटी स्कोर अधिक असलेले रुग्णही आत्मविश्वास, जिद्दीच्या बळावर उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळेच कोरोनावर मात करून घरी परतत आहेत. रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथील जयवंताबाई गंगाराम रंजवे या कोरोनायोद्धा ठरल्या आहेत. आजीबाईंना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तसेच कानाने ऐकूही सुद्धा येत नाही. अशा परिस्थितीमध्ये कोरोना सारख्या महामारीला झुंज देऊन त्या ठणठणीत झाल्या. पंधरा दिवसांपूर्वी सेनगाव तालुक्यातील कवठा येथील आरोग्य उपकेंद्र येथे त्यांना भरती करण्यात आले होते. त्यांचा सीटी स्कोर १२ होता. अशा परिस्थितीत भरती केल्यानंतर त्यांनी औषधी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. सकारात्मक विचार केला. योग्य ती काळजी घेतली. आत्मविश्वास, सकारात्मक विचार, दृढनिश्चय, चिकाटी, जिद्द, कुटुंबाचे मानसिक पाठबळ, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आदीच्या बळावर त्यांनी हिम्मत न हरता कोरोनावर मात केली. १५ दिवसानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोरोनावर यशस्वी मात करणाºया या आजीबाईचे स्वागत आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. बेले, डॉ लादे, डॉ सुभाष कोरडे, डॉ जारे डॉ कोकाटे, डॉ काकडे, डॉ चाटसे, डॉ खांडेकर, मिलिंद पडघान, योगेश राऊत, क्षीरसागर, माळोदे, शेख रफीक यांचे विशेष सहकार्य लाभले.

टॅग्स :RisodरिसोडwashimवाशिमCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या