शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

कोरोना रुग्णांनी व्यायाम, आहारावर लक्ष द्यावे - डॉ.संतोष बोरसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 20:00 IST

Coronavirus in Washim तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णांनी कोणती पथ्ये पाळावी, कोरोनावर मात केल्यानंतर कोणता आहार घ्यावा, व्यायामावर भर कसा द्यावा, यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी तथा मालेगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद. कोरोनातून बरे झाल्यानंतर आहार व व्यायामावर विशेष भर द्यावा, असा सल्ला डॉ. बोरसे यांनी दिला.

कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांनी सतर्क कसे राहावे?कोरोनापासून बचाव म्हणून नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क किंवा रुमालचा वापर आणि हात वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्येकाने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्गादरम्यान कोणती पथ्थे पाळावीत?कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर संबंधित रुग्णाने सर्वप्रथम न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे. वेळीच निदान व उपचार मिळाल्याने कोरोनातून बरे होणाºयाचे प्रमाण जास्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविणाºया अन्नपदार्थ्यांचा आहारात सर्वाधिक वापर करावा.

कोरोनातून बरे झाल्यावर पुढे कोणती दक्षता घ्यावी? कोरोनावर मात केल्यानंतर संबंधित रुग्णाने व्यायाम व सकस आहारावर भर द्यावा. हळदयुक्त दूध घ्यावे, भाजीपाला, फळांचा वापर आहारात करावा. नियमित व वेळेवर भोजन घ्यावे, एकाकीपण जाणवणार नाही तसेच मानसिक तणाव येणार नाही याची दक्षता घ्यावी. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भोजनात सलादचा वापर करावा. सलादमध्ये टमाटर, बीट, मेथीचा वापर असावा. तत्पूर्वी ते कोमट पाण्यात लिंबू पिळून स्वच्छ करून घ्यावे. ग्रीन टिचे प्राशन करावे. त्यामध्ये अद्रक, दालचिनी, तुळशीची पाने, गवती चहा व गूळाचा समावेश करता येईल.

कोणती फळे सेवन करावी?क जीवनसत्व असणाºया फळांचे सेवन करणे अधिक उत्तम. संत्रा, मोसंबी आदी फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. तसेच बाहेरचे खाद्यपदार्थ टाळावे, उघड्यावर शिजविलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत. निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेला हलका व्यायाम नियमित करावा. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी सकस आहारावर सर्वाधिक भर दिला तर कोरोनापासून पुढील काळातही बचाव होऊ शकतो. कोरोनावर मात करून घरी परतल्यावर त्या रुग्णाकडे पाहण्याचा काहींचा दृष्टिकोन बदलतो. समाजाने कोरोना रुग्णांप्रती असलेला दृष्टिकोन बदलला पाहिजे. मनोधैर्य वाढेल, अशी वर्तणूक ठेवावी. कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे अधिक सतर्क राहून प्रत्येकानेच स्वत:बरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दीत जाणे टाळावे, मास्क किंवा रूमालचा नेहमी वापर करावा..

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतcorona virusकोरोना वायरस बातम्या