शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

संस्थात्मक विलगीकरणास कोरोना रुग्णांची ना; घरातच राहण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 10:55 IST

Corona Cases in Washim : अनेकजण अजूनही गृह विलगीकरणात राहण्याला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून ग्रामीण भागात सद्य:स्थितीत २३१ ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, संस्थात्मक विलगीकरणात राहण्यास बहुतांश रुग्णांची ना असून, अनेकजण अजूनही गृह विलगीकरणात राहण्याला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. संस्थात्मक विलगीकरणाचे फायदे सांगून समुपदेशन केल्यानंतरही रुग्ण गृह विलगीकरणातच असल्याने कर्मचाऱ्यांचे प्रयत्नही निष्फळ ठरत असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी मेडशी (ता. मालेगाव) येथे आढळून आला होता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिक प्रमाणात प्रभावित झाले. मे महिन्याच्या अखेरीस दुसरी लाट ओसरत असल्याचे तूर्तास दिसून येत आहे. गत एका महिन्यापासून शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. अनेकांकडे स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने कोरोनाबाधित रुग्ण व कुटुंबातील अन्य सदस्यांकडून एकच शौचालय व स्वच्छतागृहाचा वापर होतो. त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांनादेखील संसर्ग होत असल्याचे समोर आल्याने यापुढे अपवादात्मक परिस्थिती वगळता कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणात राहता येणार नाही, असे निर्देश शासन, प्रशासनाने दिलेले आहेत. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश आरोग्य विभाग, ग्रामपंचायतींना दिलेले आहेत. त्यानुसार शासकीय, निमशासकीय इमारती, जिल्हा परिषद शाळेच्या इमारती अधिग्रहित करण्यात येत असून, तेथे संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध केली जात आहे. आतापर्यंत २३१ ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे, संस्थात्मक विलगीकरणात राहण्यास रुग्णांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. सध्या जिल्ह्यात २४३७ सक्रिय रुग्ण यांपैकी ३३७ रुग्ण हे रुग्णालयांत दाखल आहे, तर ४४० च्या आसपास रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. उर्वरित १,६६० रुग्ण हे गृह विलगीकरणातच असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या २३१ ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आपल्यापासून कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणात राहावे, याबाबत स्थानिक कर्मचारी, आरोग्य विभागातर्फे समुपदेशनही केले जात आहे.-डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम