शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही वाढले कोरोनाचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 11:04 IST

१५ जुलैपासून रिसोड व मंगरूळपीर येथे संपूर्ण लॉकडाऊन तर उर्वरीत चार शहरांमध्ये दुपारी २ वाजतानंतर लॉकडाऊन आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटेल, असा दावा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असला तरी लॉकडाऊनच्या काळातही कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लॉकडाऊन हा प्राथमिक पातळीवरील उपाय होता. तो आता फारसा प्रभावी व उपयुक्त ठरत नसल्याचे तथ्य समोर येत आहे. १५ जुलैपासून रिसोड व मंगरूळपीर येथे संपूर्ण लॉकडाऊन तर उर्वरीत चार शहरांमध्ये दुपारी २ वाजतानंतर लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या पाच दिवसात ८८ रुग्णांची भर पडली असून, जेथे संपूर्ण लॉकडाऊन आहे अशा रिसोड व मंगरूळपीर येथेच सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यात जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६६ वर पोहचली. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून १५ जुलैपासून सात दिवसापर्यंत रिसोड व मंगरूळपीर येथे संपूर्ण लॉकडाऊन तर वाशिमसह उर्वरीत चार शहरांत दुपारी २ वाजतानंतर लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या पाच दिवसात ८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. संपूर्ण लॉकडाऊन असलेल्या रिसोड येथे २६ तर मंगरूळपीर येथील जवळपास २४ जणांचा समावेश आहे.आणखी १५ कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३६६१९ जुलै रोजी दिवसभरात १५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये मालेगाव तालुक्यातील इराळा येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली. ही व्यक्ती यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे. रिसोड शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील ३ व गजानन महाराज मंदिर परिसरातील १, कारंजा लाड शहरातील साई नगर परिसरातील २ आणि वाशिम शहरातील फकीरपुरा परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. सायंकाळी ७.३० वाजताच्या अहवालानुसार, मंगरुळपीर शहरातील काझीपुरा येथील ३, टेकडीपुरा येथील ३ व पठाणपुरा येथील १ व्यक्तीचा समावेश आहे. यापूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने या सर्वांना कोरोनाचा संसर्ग झाला.

मालेगाव येथील महिलेचा मृत्यूरॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये ११ जुलै रोजी मालेगाव येथील एक महिला पॉझिटिव्ह आढळली होती. उपचारादरम्यान १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान जिल्हा कोविड रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या महिलेला न्यूमोनिया होता, असे आरोग्य विभागाने १९ जुलै रोजी स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या