शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनहून आलेल्या कोरोना रुग्णाचा पुन्हा स्वॅब घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 11:41 IST

A Corona patient return from Britain स्वॅब  घेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने २७ डिसेंबर रोजी स्पष्ट केले.

ठळक मुद्देरिसोड येथे परतलेल्या एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल २६ डिसेंबरला पॉझिटिव्ह आला. या रुग्णाच्या संपर्कातील अन्य दोन जणांनादेखील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ब्रिटनहून रिसोड येथे एक महिन्यापूर्वी परतलेल्या एक जणाचा कोरोना चाचणी अहवाल २६ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून या रुग्णाचा पुन्हा स्वॅब  घेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने २७ डिसेंबर रोजी स्पष्ट केले.सध्या ब्रिटनमधील काही भागांत कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू आढळला आहे. या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने तसेच युवावर्गामध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात ब्रिटनमधून जिल्ह्यात परतलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. ब्रिटनहून २८ नोव्हेंबर रोजी रिसोड येथे परतलेल्या एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल २६ डिसेंबरला पॉझिटिव्ह आला. दरम्यान, या रुग्णामध्ये आढळून आलेला कोरोना विषाणू हा नेमका कोणत्या प्रकारातील आहे, हे स्पष्ट होण्यासाठी या रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत.  या रुग्णाला सध्या सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले असून, लवकरच त्यांना खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. या रुग्णाच्या संपर्कातील अन्य दोन जणांनादेखील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ब्रिटनहून परतलेल्या एका जणाला कोरोना संसर्गाची लागण झाल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, ब्रिटनहून परतलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याRisodरिसोड