शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कोरोनाची धास्ती; मोफत प्रवेशासाठीच्या कागदपत्रांसाठीही पालक येईनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 16:58 IST

अमरावती विभागातील ३० टक्के पेक्षा अधिक पालकांनी कागदपत्रे सादर केली नाहीत.

- संतोष वानखडेवाशिम : आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पालकांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. अमरावती विभागातील ३० टक्के पेक्षा अधिक पालकांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. यावरून पालकांनीही कोरोनाची धास्ती घेतल्याचे दिसून येते. दरम्यान, राज्यातील एकूण ९३३१ शाळेतील एक लाख १५ हजार ४४६ जागेसाठी एक लाख ९२६ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झालेली आहे. १ जुलैपर्यंत एकाही बालकाचा प्रवेश झालेला नाही.आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेबाबत आॅनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली. लॉटरीव्दारे राज्यातील एकूण ९३३१ शाळेतील एक लाख १५ हजार ४४६ जागेसाठी एक लाख ९२६ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झालेली आहे. यामध्ये अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील २३२३ मोफत जागेसाठी २२७८ बालक, बुलडाणा जिल्ह्यात २७८५ जागेसाठी १७४२, अमरावती जिल्ह्यात २४८६ जागेसाठी २४५६, वाशिम जिल्ह्यात १०११ जागेसाठी ९७६, यवतमाळ जिल्ह्यात १७०१ जागेसाठी १६४७ बालकांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज प्रभावित झाले. २० जून दरम्यान शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळास्तरावर कागदपत्राची प्राथमिक पडताळणी करुन व संकलन करुन तालुकास्तरीय पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येणार आहेत. दुसरीकडे कोरोनाची धास्ती असल्याने अमरावती विभागातील ३० टक्क्यापेक्षा अधिक पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी संबंधित शाळेशी संपर्क साधलेला नाही. कोणताही बालक मोफत प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून यावर्षी कागदपत्र पडताळणी व प्रवेशासाठी तीन वेळा संधी दिली जाणार आहे. तीन वेळाही पालक नियोजित तारखेला अनुपस्थित राहिले तर चवथ्यांदा प्रतिक्षा यादीतील बालकाला संधी दिली जाणार आहे. राज्यात अद्याप एकाही बालकाचा प्रवेश झालेला नाही.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा