शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त रुग्णास टाळ्याच्या गजरात रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 14:14 IST

रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यास २५ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातर्फे टाळयांच्या गडगडाटात डिस्चार्ज देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात पहिला कोरोनाचा पॉझिटीव्ह  रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. सदर रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यास २५ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातर्फे टाळयांच्या गडगडाटात डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आयसोलेशन वार्डातील डॉक्टर, परिचारिका  व कर्मचाºयांनी भावूक होऊन कोरोनामुक्त रुग्णास निरोप दिला. रुग्णानेही अतिशय कठोर अंतकरणाने आरोग्य विभागाचे आभार मानलेत.जिल्ह्याबाहेर प्रवास करून आलेल्या या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची बाब ३ एप्रिल रोजी आलेल्या त्याच्या घशातील स्त्रावाच्या अहवालावरून समोर आली. त्यानंतर कोरोना बाधित व्यक्तींवर उपचार करण्यासाठी नेमलेल्या आरोग्य पथकाने त्याच्यावर शासनाच्या नियमावलीनुसार उपचार सुरु केले. सातत्याने उपचार करून १४ व १५ व्या दिवशी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, यामधील एक अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या व्यक्तीचा रुग्णालयातील मुक्काम पाच दिवसांनी वाढला. पुढील पाच दिवस उपचार केल्यानंतर २० व २१ व्या दिवशी पुन्हा घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले. यावेळी मात्र, त्याच्यावर उपचार करणाº्या आरोग्य पथकाच्या प्रयत्नांना यश आले. या व्यक्तीचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याचे २४ एप्रिल रोजी स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला रुग्णालयातून सोडण्याचा मार्ग मोकळा झाला.  २५ एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांच्या उपस्थित या व्यक्तीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी या व्यक्तीला टाळ्या वाजवून निरोप दिला. यावेळी भावूक होत सदर व्यक्तीने त्याच्यावर उपचार करणाº्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाº्यांचे आभार मानले. तसेच जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला सुद्धा धन्यवाद दिले. ‘साहब आपने बहोत मेहनत किया - रुग्ण‘साहब, आपने बहोत मेहनत किया...’ असे म्हणत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे आभार मानेल. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी त्या व्यक्तीला टाळ्या वाजवून निरोप दिला.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या