शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Right To Education :कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 11:48 IST

Right To Education : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण विभागाच्या पुढील सूचनेनुसार पालकांना पडताळणी समितीकडे जाता येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीईअंतर्गत पहिल्या लॉटरीमध्ये राज्यातील २.२५ लाखापैकी ८२ हजार बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण विभागाच्या पुढील सूचनेनुसार पालकांना पडताळणी समितीकडे जाता येणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग, मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व माध्यमांच्या खासगी, विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये पहिल्या वर्गात २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी राज्यातील ९,४३२ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ९६ हजार ६८४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ९६ हजार ६८४ जागांकरिता २ लाख २२ हजार ५८४ बालकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. ७ एप्रिलला पुण्यातून एकाच वेळी लॉटरी काढली असून, यामध्ये ८२ हजार १२९ बालकांची निवड करण्यात आली. मात्र, त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कठोर करण्यात आल्याने आणि संचारबंदीही लागू केल्याने प्रवेश प्रक्रिया प्रभावित पडली. ३० एप्रिलनंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ववत होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, १५ मेपर्यंत संचारबंदीला मुदतवाढ दिल्याने प्रवेश प्रक्रिया आणखी लांबणीवर पडली आहे. पुढील आदेशापर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित असून, पडताळणी समितीकडे पालकांना जाऊ नये, अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत. पहिल्या सोडतीमध्ये वाशिम जिल्ह्यातील ६३० बालकांची निवड झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवड प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगितले जात आहे. तूर्तास बालकांसह पालकांना मोफत प्रवेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील १०३ शाळांमधील ७०९ जागांकरिता पहिल्या सोडतीत ६३० बालकांची निवड झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रवेश प्रक्रिया तूर्तास थांबविण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. तोपर्यंत पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊ नये.- गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, वाशिम

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाwashimवाशिम