शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना : बाजार समित्यांसह उपबाजारांतील व्यवहार बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 11:13 IST

तीन बाजार समित्यांसह दोन उपबाजारांचे व्यवहार अद्यापही पूर्णपणे सुरळीत होऊ शकले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या अटींवर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितींमध्ये जीवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहार सुरु ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी ३० मार्च रोजी दिला. तथापि, काही तांत्रिक अडचणींमुळे तीन बाजार समित्यांसह दोन उपबाजारांचे व्यवहार अद्यापही पूर्णपणे सुरळीत होऊ शकले नाहीत. आता कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बाजार समित्यांत आवश्यक उपाय योजना सुरू असून, येत्या दोन दिवसांत सर्व बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रवि गडेकर यांनी मंगळवारी दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांतील धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. तथापि, पणन सचांलक, पणन संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या २६ आणि २७ मार्च रोजीच्या कार्यालयीन परिपत्रकान्वये सर्व बाजार समित्यांत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होणार नाही, याची दक्षता घेऊन जिवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी हृषिकेष मोडक यांनी जिल्हा उपनिबंधकांशी चर्चा करून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी गर्दी कमी करणे, आवश्यक खबरदारी घेण्याच्या अटींवर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितींमध्ये जीवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहार सुरु ठेवण्याचा आदेश ३० मार्च रोजी दिला. त्यानंतर मालेगाव आणि कारंजा येथील बाजार समित्यांत व्यवहार सुरूही झाले. तथापि, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोड येथील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होऊ शकले नाहीत. दरम्यान, मंगरुळपीरचा उपबाजार असलेल्या शेलुबाजार येथे मंगळवारी ५० क्विंटल शेतमालाची खरेदी झाली. आता सर्व बाजार समित्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी उपाय योजना करण्यात येत असून, येत्या दोन दिवसांत सर्व बाजार समित्यांतील व्यवहार सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम