लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवारी (दि.१७) आणखी तीनजणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४१० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३६१५९ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. सोमवारी नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. ४१० नवीन रुग्ण आढळले, तर ४९१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम, रिसोड शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुसरीकडे मृत्यूसत्रही सुरूच असल्याचे दिसून येते. सोमवारच्या अहवालानुसार उपचारांदरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला. एकूण ४१० जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम ९१, मालेगाव तालुक्यातील २६, रिसोड तालुक्यातील १३३, मंगरूळपीर तालुक्यातील ६०, कारंजा तालुक्यातील आठ आणि मानोरा तालुक्यात ६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील २३ बाधितांची नोंद झाली आहे.
Corona Cases in Washim : आणखी तिघांचा मृत्यू; ४१० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:14 IST