शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Washim : आणखी सात जणांचा मृत्यू; ४०६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 17:54 IST

Corona Cases in Washim: २० मे रोजी आणखी सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४०६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

वाशिम : तीन दिवसानंतर जिल्ह्यात कोरोनाचा कहर पुन्हा दिसून येत असून, गुरूवार, २० मे रोजी आणखी सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४०६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३७२७७ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. गत तीन दिवसांत कोरोनाबळी आणि नवीन रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना, गुरूवारी पुन्हा सात जणांचा मृत्यू तर ४०६ जणांना कोरोना संसर्ग झाल्याची नोंद घेण्यात आली. सात जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, वाशिम तालुक्यात चार दिवसानंतर सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. गुरूवारच्या अहवालानुसार वाशिम तालुक्यात ११२  तर सर्वात कमी रुग्ण मानोरा तालुक्यात १८ आढळून आले. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. गुरूवारी ४०६ नव्याने रुग्ण आढळून आले तर ४६७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील २० बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांचा आलेख खाली येत असला तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे कुणीही गाफील राहू नये. कुठेही गर्दी न करता कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले. 

४१०१ सक्रिय रुग्णगुरूवारच्या अहवालानुसार नव्याने ४०६ रुग्ण आढळून आले तर ४६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ४१०१ रुग्ण सक्रिय आहेत.000000000000

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या