कारंजा नगर पालिकेच्या सभापती व स्थायी समितीची निवड अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:35 AM2021-01-17T04:35:54+5:302021-01-17T04:35:54+5:30

विशेष समित्यांमध्ये नियोजन व विकास समिती सभापतिपदी गटनेते ॲड.फिरोज छट्टू शेकूवाले, शिक्षण समिती सभापती पदी अब्दुल एजाज अब्दुक मन्नान,आरोग्य ...

Controversy over election of Karanja Municipality Chairman and Standing Committee | कारंजा नगर पालिकेच्या सभापती व स्थायी समितीची निवड अविरोध

कारंजा नगर पालिकेच्या सभापती व स्थायी समितीची निवड अविरोध

Next

विशेष समित्यांमध्ये नियोजन व विकास समिती सभापतिपदी गटनेते ॲड.फिरोज छट्टू शेकूवाले, शिक्षण समिती सभापती पदी अब्दुल एजाज अब्दुक मन्नान,आरोग्य व वैद्यकीय रक्षण समिती सभापती मुबारक तमीज खान ,सार्वजनिक बांधकाम सभापतिपदी चाँद शाह कासम शहा,महिला व बालकल्याण सभापतिपदी शाहीनबी इकबाल हुसैन, महिला बालकल्याण उपसभापतिपदी अनिसाबी शेख युनूस यांची निवड करण्यात आली आहे.तसेच उपाध्यक्ष हे पदसिद्ध पाणीपुरवठा सभापती पदी जुम्मा पप्पु पप्पुवाले यांची निवड करण्यात आली. स्थायी समिती मध्ये सलीम शे.लालू गारवे, निसार खान नजीर खान, नितीन अशोक गढवाले यांना घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे कारंजा पालिकेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत सर्व सभापती तसेच दोन स्थायी समितीचे सदस्य हे युसूफ पुंजानी गटाचे झाले. तर केवळ आघाडीचे स्थायी समितीमध्ये एक सदस्य निवडून आले. सभापतिपदाच्या निवडणुकीनंतर मो.युसूफ पुंजानी,नगराध्यक्ष शेषराव ढोके तसेच नगर परिषद प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला.

Web Title: Controversy over election of Karanja Municipality Chairman and Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.