शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 16:15 IST

शासकीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ती योग्यरित्या हाताळण्यासाठी प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये १ जूनपूर्वी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने शासकीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाले आहेत.जिल्ह्यातील मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा तसेच सर्व तहसीलदार कार्यालये, पोलीस स्टेशन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, महावितरणच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याची कार्यवाही १ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.  पोहणाºयांची माहिती संकलितसर्व तहसीलदारांनी पोहणाºया व्यक्तींची तालुकानिहाय माहिती संकलित करावी, अशा सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार पोहणाºया व्यक्तींची माहिती संकलित करण्याचे काम पुर्णत्वाकडे आले आहे.   साथरोग नियंत्रण पथक सज्जआगामी पावसाळ्यात साथरोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. साथरोगावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रात साथरोग नियंत्रण पथक तयार ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रण पथक तयार केले आहे.नालेसफाई व दुरूस्तीचे काम पुर्णत्वाकडेजिल्ह्यातील नगर परिषदांनी शहरातील नाले सफाई व दुरुस्तीचे काम ३० मे पूर्वी पूर्ण करावे. घनकचºयामुळे नाले तुंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या होत्या. तथापि, ३० मे पूर्वी शहरातील नाले सफाई व दुरूस्तीची कामे पूर्ण झाली नसल्याचे दिसून येते. जून महिन्याच्या १० तारखेपर्यंत नाले सफाई व दुरूस्तीची कामे पूर्ण होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिम