वाशिम : तालुक्यातील सावरगाव बर्डे येथील एका हॉटेलमध्ये कंटेनर शिरल्याने यामध्ये दोन लाख रुपये नुकसान झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३0 वाजताच्या दरम्यान घडली. वाशिमहून मालेगावकडे जाणारा कंटेनर क्रमांक एच.आर. ४७- बी. ५८५७ गतिरोधकावर आदळल्याने या वाहनावरील चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर सरळ संतोष चिंतामण कड यांच्या हॉटेलमध्ये शिरले. यामध्ये हॉटेल तर पूर्णपणे नेस्तानाबूद झालेच शिवाय यामधील वस्तूही निकामी झाल्या. हॉटेलच्या बाजूला उभ्या असलेल्या ऑटो क्रमांक एम.एच. ३७ बी ६१0८ लाही कंटेनरने जबर धडक दिल्याने ऑटोचे जवळपास ५0 हजार रुपयांचे नुकसान झाले. कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने हॉटेलमधील टीव्ही, फ्रीज, गॅस, कपाटासह इतर साहित्य तुटफूट होऊन जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
कंटेनरची हॉटेलला धडक, दोन लाखांचे नुकसान
By admin | Updated: February 17, 2015 01:45 IST