शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सुरकंडी, वाशिम येथील मृतकांच्या कुटूंबियांचे खासदारांकडून सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 14:12 IST

वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी मृतकांच्या कुटुंबियांची २३ सप्टेंबर रोजी भेट घेऊन सांत्वन केले, तसेच जखमींचीही विचारपूस केली.

ठळक मुद्देयावेळी मृतकांच्या कुटुंबियांसह जखमींना शासकीय मदत मिळवून देण्याचे आवश्यक त्यांनी दिले.  मृतकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तसेच इतर मार्गाने जमेल तशी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम:  हिंगोली नजिक ट्रक व कारच्या भीषण अपघातात वाशिम व सुरकंडी येथील सहा जण मृत्युमुखी पडले, तसेच दोन जण जखमी झाले. वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी मृतकांच्या कुटुंबियांची २३ सप्टेंबर रोजी भेट घेऊन सांत्वन केले, तसेच जखमींचीही विचारपूस केली. यावेळी मृतकांच्या कुटुंबियांसह जखमींना शासकीय मदत मिळवून देण्याचे आवश्यक त्यांनी दिले.   गणेश विसर्जनासाठी ढोलताशा ठरविण्यासाठी वाशिम येथील गणेश हजारे, सतीश मुरकुटे, नरसिंह हजारे व सुरकंडी येथील अनिल चव्हाण, स्वप्नील इरतकर, राजू धामणे, मदन चव्हाण व सखाराम चव्हाण हे आठ जण २० सप्टेंबर रोजी वाहनाने हिंगोलीकडे रात्री जात होते. दरम्यान, वाशिम हिंगोली मार्गावरील अन्नपूर्णा इंटरनॅशनल शाळेजवळ ट्रॅक व त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यात गणेश हजारे, नरसिंह हजारे, सतीश मुरकुटे, राजू धामणे, स्वप्नील इरतकर व अनिल चव्हाण या सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मदन चव्हाण व सखाराम जाधव हे गंभीर जखमी झाले. यातील मदन चव्हाण हे मृत्यूशी झुंज देत आहेत.  या घटनेची माहिती मिळताच २३ सप्टेंबर रोजी सकाळी खासदार गवळी यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. अपघातग्रस्त अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने जखमींना उपचारासाठी, तसेच मृतकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तसेच इतर मार्गाने जमेल तशी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, रवी भांदुगे, निलेश पेंढारकर व इतर कार्यकर्ते  उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळी