शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या  पावसाचा परिणाम; उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 17:37 IST

वाशिम: अमरावती विभागात गतवर्षी पडलेल्या अपुऱ्या  पावसाचा परिणाम यंदाच्या उन्हाळी पिक पेरणीवर झाला असून, मार्च महिन्याला सुरुवात झाली तरी, अद्याप १० टक्के क्षेत्रावरही उन्हाळी पिकांची पेरणी झालेली नाही.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात मागील वर्षी ८६६३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. यंदा सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात केव्ळ ३४२ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.अगदी नगण्य प्रमाणात उन्हाळी पिकांची पेरणी झाल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे.

वाशिम: अमरावती विभागात गतवर्षी पडलेल्या अपुऱ्या  पावसाचा परिणाम यंदाच्या उन्हाळी पिक पेरणीवर झाला असून, मार्च महिन्याला सुरुवात झाली तरी, अद्याप १० टक्के क्षेत्रावरही उन्हाळी पिकांची पेरणी झालेली नाही. सिंचनासाठी पाणीच नसल्याने यंदा उन्हाळी पिके पेरण्याचे धाडस शेतकºयांनी केले नाही.अमरावती विभागात गतवर्षी मुबलक पाऊस पडल्याने उन्हाळी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते. एकूण पाच जिल्हे मिळून तब्ब्ल ७३२६९ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक ६० टक्के प्रमाण हे भुईमुगाचे होते. तथापि, गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाल्याने विहिरी, तलाव आटले असून, शेतकºयांनी पिकांना पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे पिकांची पेरणी करून आणखी संकट ओढवून घेण्याऐवजी शेतकºयांनी पेरणीकडे पाठ केल्याचे दिसत आहे. मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात ४१३६९ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. यंदा मात्र सद्यस्थितीत केवळ १३४१ हेक्टरवर उन्हाळी पिके पेरण्यात आली आहेत. बुलडाणा जिल्ह्यात गतवर्षी १७०११ हेक्टरवर उन्हाळी पिकांचे क्षेत्र होते. ते प्रमाण यंदा सद्यस्थितीत केवळ १९४० हेक्टरवर आले आहे. वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी ८६६३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. यंदा सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात केव्ळ ३४२ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. अकोला जिल्ह्यात गतवर्षी ५०७८ आणि अमरावती जिल्ह्यात ११४८ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. या जिल्ह्यांचा प्राथमिक पीक पेरणी अहवाल प्राप्त झाला नसला तरी, या दोन्ही जिल्ह्यांत अगदी नगण्य प्रमाणात उन्हाळी पिकांची पेरणी झाल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती