शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

 पैसे भरूनही रखडल्या वाशिम जिल्ह्यातील पाच हजार कृषीपंप जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 16:42 IST

Washim Mahavitran News दोन वर्षांच्या काळात ७ हजारांवर शेतकऱ्यांनी असे अर्ज केले. 

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: निसर्गाच्या अनियमिततेमुळे होणारे नुकसान टाळण्यासह रब्बी हंगामात सिंचन करून स्वत:चा आर्थिक विकास साधण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यानी महावितरणकडे कृषीपंप जोडणीसाठी अर्ज केले. त्यापैकी ५११७ शेतकऱ्यानी रितसर पैसे भरूनही त्यांना दोन वर्षांपासून कृषीपंप जोडणीच मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचा सलग दुसरा रब्बी हंगामही हातून जाणार आहे.वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पावसाच्या अनियमिततेचा फटका वारंवार बसतो. अनेकदा अवर्षणामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होते, तर रब्बी हंगामातही पाणी उपलब्ध असताना वापर करण्यास साधने नसल्याने शेतकऱ्याना स्वत:चा आर्थिक विकास साधणे शक्य होत नाही. असे अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन विहिरी घेऊन किंवा जिल्ह्यातील जलस्त्रोतांच्या आधारे सिंचन करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी  महावितरणकडे अर्ज करीत आहेत. दोन वर्षांच्या काळात ७ हजारांवर शेतकऱ्यांनी असे अर्ज केले. तथापि, त्यापैकी ५ हजार ११७ शेतकºयांनी पैसे भरूनही त्यांना अद्याप वीज जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना यंदाही रब्बी हंगामापासून वंचित राहावे लागणार आहे.   सौरपंपाबाबत अनेक शेतकरी अनुत्सूकज्या शेतकºयांनी मार्च २०१८ नंतर महावितरणकडे कृषीपंप जोडणीसाठी अर्ज केले. त्या शेतकऱ्यांना पारंपरिक जोडणीसाठी योजना नसल्याने महावितरणने सौरपंप जोडणीचा पर्याय उपलब्ध केला आहे. जे शेतकरी यासाठी तयार आहेत. त्यांना सौरपंप दिलेही जात आहेत. तथापि, अनेक शेतकरी या पर्यायाबाबत उदासीनच असून, पारंपरिक जोडणीसाठी त्यांना याबाबतचा निर्णय होईपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

महावितरण सध्या उच्च दाब वाहिनी योजना राबवित आहे. त्यात एका शेतकरी ग्राहकासाठी अडीच लाख खर्च येतो. यानुसार ३१ मार्चपूर्वी ज्या शेतकºयांनी पैसे भरले त्यांना जोडणी दिली जात आहे. तथापि, मार्च २०१८ नंतर कोणतीच योजना नसल्याने शेतकऱ्यांना पारंपरिक वीज जोडणी देणे अशक्य झाले आहे.-पी. एम. राठोड,जनसंपर्क अधिकारी, 

टॅग्स :agricultureशेतीwashimवाशिमmahavitaranमहावितरण