जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारंजा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने झनक, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बलराम महाराज राठोड, प्रदेश सचिव दिलीप भोजराज, सुनील धाबेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी झनक यांनी आपसातील मतभेद विसरून पक्षकार्याला प्राधान्य द्यावे व कॉंग्रेस पक्षाची विचारधारा समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहचविण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.
संवाद बैठकीस कारंजा तालुकाध्यक्ष रमेश लांडकर, कारंजा शहराध्यक्ष हमीद शेख, ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ डोणगावकर, मारोती पहेलवान, ज्योती गणेशपुरे, न. प. शिक्षण सभापती अ. एजाज, नगरसेवक युनूस खान, इर्शाद अली, शहर उपाध्यक्ष हाफिज राज, कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष राज चौधरी, उपाध्यक्ष आकीब जावेद, सेवादलचे फिरोज प्यारेवाले, युसूफ जत्तावले, नगरसेवक सै. मुजाहिद, अ. आसिफभाई, मनीष भेलांडे, उमेश शितोळे, युवा शहराध्यक्ष अमीर पठाण, उस्मान खान, प्रदीप वानखडे, अभिजीत शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक हमीद शेख यांनी केले. संचालन विजय देशमुख यांनी केले; तर राज चौधरी यांनी आभार मानले.