शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 14:20 IST

अतिवृष्टीत पीक नुकसान झालेल्या शेतकºयांत संभ्रम निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसानाच्या मदतीची प्रतिक्षा लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  वाशिम जिल्ह्यातही शेजमीन खरडण्याच्या, तसेच मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले होते. पिकांच्या या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली; परंतु या संदर्भातील अतिवृष्टीने खरडलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ३७५०० प्रमाणे मदत देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे अतिवृष्टीत पीक नुकसान झालेल्या शेतकºयांत संभ्रम निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसानाच्या मदतीची प्रतिक्षा लागली आहे.गतवर्षी जुन ते आॅगस्टदरम्यान अतिवृष्टी झाल्याने राज्यात हजारो शेतकºयांच्या शेतजमिनी खरडल्या, तसेच पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाशिम जिल्ह्यातही १५ ते २० आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकºयांची शेतजमीन खरडून गेली, तसेच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. महसूल व कृषी विभागाने या नैसर्गिक आपत्तीचे सर्वेक्षण करून संयुक्त पंचनामा तयार केला. या पंचनाम्याच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी ४.५९ कोटी रुपयांच्या मागणीचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर केला. आता शासनाने गतवर्षी जुन ते आॅगस्टदरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकºयांच्या नुकसानापोटी आर्थिक मदत म्हणून शासनाने ४६ कोटी ४५ लाख ८ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास २५ जुलैच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली; परंतु खरडून गेलेल्या किंवा वाहून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसानासाठी मदत, असा उल्लेख यात करण्यात आला आहे. त्यातच वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना केवळ ६११.४४ हेक्टर क्षेत्रासाठीच शासनाने २ कोटी २९ लाख २९ हजार रुपये मदत निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे केवळ पीक नुकसानासाठी मदत मिळणार की नाही, हा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकºयांना पडला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती