शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

परस्परविरोधी तक्रार; १४ जणांविरूद्ध गुन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:47 PM

रिसोड : पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे, या कारणाहून २३ आॅक्टोबर रोजी रिसोड पोलीस स्टेशन परिसरातच दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटाने परस्पराविरूद्ध दिलेल्या तक्रारीहून रिसोड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १४ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये एका नगरसेवकाचाही समावेश आहे.

ठळक मुद्देनगरसेवकाचा समावेश जून्या कारणाहून वाद

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे, या कारणाहून २३ आॅक्टोबर रोजी रिसोड पोलीस स्टेशन परिसरातच दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटाने परस्पराविरूद्ध दिलेल्या तक्रारीहून रिसोड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १४ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये एका नगरसेवकाचाही समावेश आहे.रिसोड शहरातील आसनगल्ली परिसरात वास्तव्यास असलेले जगन्नाथ नेमाडे यांच्या घरासमोर भाउबीजेच्या दिवशी सायंकाळी पंकज हलगे यांनी फटाके फोडल्यावरून शाब्दीक वाद निर्माण झाला होता. प्रकरण पोलिसांना तक्रार देण्यापर्यंत गेले होते. त्यातून सदर घटनेची दखल घेत पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना पोलिस स्टेशनला बोलविले होते. सोमवार, २३ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता पोलिस स्टेशन समोर दोन्ही गटातील मंडळी जमली. यावेळी दोन्ही गटात सुरूवातीला शाब्दीक चकमक उडाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांना मारहाण केली. परस्परविरोधी तक्रारीहून रिसोड पोलिसांनी दोन्ही गटातील १४ जणांविरूद्ध भादंवी कलम १४३, १४७, १४९, ३२३, १३५ नुसार गुन्हे दाखल केले. जगन्नाथ श्रावण नेमाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नगसेवक सागर डांगे, पंकज हलगे, सोनू हांडे, प्रदिप घायाळ, शंकर पत्तरवाळे, गणेश देशपांडे, सुरज चिपडे यांच्यावर गुन्हे दाखल केले तर मयूर अशोक हांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अ‍ॅड. कृष्णा आसनकर, जगन्नाथ  नेमाडे, किरण कंडाळे, बजरंग कोकाटे, चेैतन्य आसनकर, अशोक थोरात, हरिष नेमाडे यांचेविरोधात उपरोक्त कलमान्वये गुन्हे दाखल केले. घटनेतील अशोक थोरात, सोनू  हांडे, पंकज हलगे या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित ११ आरोपी फरार झाले आहे. फरार आरोपींचा शोध रिसोड पोलीस घेत आहेत. सदर घटनेचा तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय आमटे, जर्नाधन गिव्हे करीत आहेत. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे