-------
लाईनमनच्या रिक्त पदांची समस्या कायम
मेडशी: महावितरणच्या मेडशी येथील कार्यालयात लाईनमनची तीन पदे रिक्त आहेत. ही पदे भरली नाहीत. त्यामुळे घरगुती आणि शेतकरी मिळून १३०० ग्राहकांना वीज खंडित झाल्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.
--------
मतदान केंद्राची साफसफाई
किन्हीराजा: येत्या १५ जानेवारीला परिसरातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदान केंद्रांची साफसफाई सुरू केली असून, यासाठी सोमवारी शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.
----------
अवैध वाळू वाहतुकीला लगाम
शिरपूर: मालेगाव तालुक्यातील नदी नाल्यांतून वाळू चोरटे अवैध उपसा करून वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे करण्यात आल्यानंतर महसूल प्रशासनाने नदी, नाले परिसरात कर्मचाऱ्यांना फेरी मारण्याच्या सूचना सोमवारी दिल्या.
-----------
अर्ज करूनही वीज जोडणी मिळेना
इंझोरी : दरवर्षीप्रमाणे येथील गजानन नगरीत वास्तव्य असलेल्या कुटुंबांना वीजजोडणीची सुविधा देण्यासाठी महावितरणने वीज खांबांची उभारणी करून त्यावर वाहिनीही टाकली. त्यामुळे काही लोकांनी वीजजोडणीसाठी अर्ज केले, परंतु महिना उलटूनही त्यांना जोडणी मिळाली नाही.
---------
मेडशी येथील नाल्यांची सफाई
मेडशी: गेल्या महिनाभरापासून मेडशी येथील नाल्यांची सफाई न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले होते. ग्रामस्थांनी या संदर्भात तक्रारी केल्यानंतर सोमवारी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नाल्यांची सफाई करून घेतली.
-------
रात्रभर वीजपुरवठा राहिला खंडित
जऊळका रेल्वे: गत शेतकरी रब्बी पिकांच्या सिंचनासाठी धडपड करीत असताना जऊळका रेल्वे परिसरातील दोन गावांत रविवारी रात्रभर वीज पुरवठा खंडित राहिला. त्यामुळे पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही.
-----------
२३ वाहनांवर दंडात्मक कारवाई
उंबर्डा बाजार: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. यात सोमवारी यवतमाळ-वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर सावळी फाट्यानजीक पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी करीत २३ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
-------------
किड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कामरगाव: कारंजा तालुका कृषी विभागाच्या वतीने रब्बी पिकांवरील किड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत कामरगाव परिसरातील गावांत सोमवारी कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कीटकनाशक फवारणीपूर्वी खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
-----------------
रोहयोच्या कामापासून कामगार वंचित
पोहरादेवी: परिसरात शेतीची कामे संपल्यानंतर कामगारांना रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यात प्रशासनाकडून राेहयोची कामे सुरू करण्यात आली नसल्याने ३५ जाॅबकार्डधारकांवर उपासमारीची पाळी आली आहे.