शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

व्याख्यानमालेतून वैचारिक प्रबोधन - डॉ. सुभाष जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:08 IST

हरिभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राजस्थान महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांच्याशी साधलेला संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरात २० वर्षांपासून हरी व्याख्यानमाला सुरू आहे. यावर्षी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ९ व १० फेब्रुवारीला व्याख्यानमाला झाली. याअंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, व्याख्यानमालेचा उद्देश आदिंबाबत हरिभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राजस्थान महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांच्याशी साधलेला संवाद...

व्याख्यानमालेला सुरुवात कशी झाली?प्रतिष्ठानचे आश्रयदाता तथा समाजसेवी प्रा. हरिभाऊ क्षीरसागर सन २००० मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळालेल्या भविष्य निर्वाह निधीतून काही रक्कम त्यांनी आम्हाला दिली. बँकेतील ठेवीच्या व्याजातून आम्ही ही व्याख्यानमाला चालविली जाते. त्यास २० वर्षे पूर्ण झाली असून श्रोत्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत कोणकोणते वक्ते व्याख्यानमालेत येऊन गेले आहेत?सन २००० मध्ये प्राचार्य राम शेवाळकर यांनी या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफले. तेव्हापासून आतापर्यंत डॉ. मधुकर वाकोडे, मारुती चितमपल्ली, सुरेश द्वादशीवार, मधुकर भावे, महेश मात्रे, श्रीपाद अपराजित, रा. रं. बोराडे, आसाराम लोमटे, फ. मुं. शिंदे, इंद्रजीत भालेराव, सदानंद देशमुख, विवेक घळसासी आदी दिग्गज मंडळी येऊन गेली आहे. यावर्षी डॉ. प्रदीप आगलावे आणि दिशा पिंकी शेख यांची व्याख्याने झाली.

यासाठी सहकार्य कुणाचे मिळते?ही व्याख्यानमाला सामाजिक प्रबोधनासाठी सुरू केल्याने सर्वांकडूनच सहकार्य मिळते. पुर्वीचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनोद भोंडे यांनी प्रतिष्ठानला प्रगतिपथावर आणले. आता अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आली. प्रतिष्ठानचे आश्रयदाता प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, प्रा डॉ दादाराव देशमुख, प्रा. गजानन वाघ, प्रज्ञा देशमाने, डॉ. विजय काळे ही मंडळी व्याख्यानमालेसाठी झटते.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत