शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय ज्ञानाचे प्रमाणपत्र सादर न केल्यास रोखली जाणार वेतनवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:44 IST

२८ मे २०१८ रोजी २५ जानेवारी १९९९ च्या अधिसुचनेत करण्यात आलेल्या सुधारणानुसार प्रशासकीय विभागांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगणकीय ज्ञान प्राप्त करणे अनिवार्य असून, तसे प्रमाणपत्र विभागप्रमुखांकडे सादर करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देगट अ, ब, क आणि ड संवर्गातील पदांवर नियुक्तीसाठी संगणक हाताळणे, वापराबाबतचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. संगणक हाताळणी, वापराबाबतचे ज्ञान असलेले विहित प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाºयांची वेतनवाढ, पदोन्नती रोखण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

वाशिम : २८ मे २०१८ रोजी २५ जानेवारी १९९९ च्या अधिसुचनेत करण्यात आलेल्या सुधारणानुसार प्रशासकीय विभागांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगणकीय ज्ञान प्राप्त करणे अनिवार्य असून, तसे प्रमाणपत्र विभागप्रमुखांकडे सादर करणे आवश्यक आहे. तथापि, याकडे दुर्लक्ष हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यास वेतनवाढ रोखली जाणार आहे. पदोन्नतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशारा शासनाने ३ जुलै रोजी पारित केलेल्या अध्यादेशात दिला आहे.२५ जानेवारी १९९९ च्या अधिसुचनेनुसार शासन सेवेतील गट अ, ब, क आणि ड संवर्गातील पदांवर नियुक्तीसाठी संगणक हाताळणे, वापराबाबतचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. त्या २८ मे २०१८ ला सुधारणा करण्यात आल्या असून यापुढे संगणक हाताळणी, वापराबाबतचे ज्ञान असलेले विहित प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाºयांची वेतनवाढ, पदोन्नती रोखण्याची कार्यवाही केली जाणार आहे. यासंदर्भात मंत्रालयासह वरिष्ठ पातळीवरील सर्व विभागांना तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी यांनाही नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांना यापुर्वीच संगणक हाताळणी, वापराबाबतचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून ३ जुलै रोजी पारित झालेल्या अध्यादेशानुसार यापुढेही कार्यवाही सुरू राहील.- लक्ष्मीनारायण मिश्रा,जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमGovernmentसरकार