शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांच्या दिवाळीवर संक्रांत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 18:34 IST

वाशिम: गेल्या वर्षभरापासून मंगरुळपीर तालुक्यातील ५५ संगणक परिचालकांचे मानधनच मिळाले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता निर्माण झाली  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या वर्षभरापासून मंगरुळपीर तालुक्यातील ५५ संगणक परिचालकांचे मानधनच मिळाले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता निर्माण झाली  आहे.केंद्र आणि राज्य सरकार कोणतेही काम करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा आधार घेत आहे. शेतकºयांच्या विविध कामांसह सर्व प्रकारचे आॅनलाईन काम या संगणक  परिचालकांकडून करण्यात येते. मात्र या कामगारांनाच वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.  जून २०१७ ते सप्टेंबर २०१८ पासून ५५ पैकी एकाही  संगणक परिचालकाला सेवेचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करीत असून, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांचे मानधन प्रलंबित  असल्याने त्यांची दिवाळीही अंधारातच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'आपले सरकार'च्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना आॅनलाईन सेवा देणाºया मंगरुळपीर तालुक्यातील ५५ संगणक परिचालकांपैकी काही जणांचे मानधन सहा महिन्यांपासून, तर काहींचे वर्षभरापासून प्रलंबित आहे. आवास योजनेच्या सर्वेचे मानधनही प्रलंबित शासनाच्यावतीन प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत पंचायत समित्यांमार्फत सर्वेक्षणासाठी याद्या तयार करण्यात आल्या. या याद्यानुसार घरोघरी सर्वे करून त्याची नोंद प्रधानमंत्री  आवास योजनेच्या अ‍ॅपवर करण्याचे कामही संगणक परिचालकांच्यावतीने करण्यात आले. या अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील १० हजारांच्यावर नोंदी संगणक परिचालकांनी  केल्या. या नोंदीसाठी प्रत्येकी २० रुपये प्रमाणे मोबदला म्हणून ठरलेले मानधनही अद्याप संगणक परिचालकांना मिळालेले नाही.  गटविकास अधिकाºयांना निवेदनमंगरुळपीर तालुक्यातील ५५ संगण परिचालकांचे मानधन जून २०१७ पासून रखडल्याने या संगणक परिचालकांवर आर्थिक संकटच कोसळले आहे. त्यांनी याबाबत मंगरुळपीरच्या गटविकास अधिकाºयांकडे निवेदन सादर करून मानधन अदा करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर