शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकाच तयार करतेय कंपोस्ट खत; दरमहा ६ ते ७ टन खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:01 IST

- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शहरातील बगिच्यांना, नगरपरिषद क्षेत्रातील झाडांना देण्यासाठी नगरपालिका शहरातून गोळा करीत असलेल्या कचऱ्यातून स्वत: कंपोस्ट खत तयार करीत आहे. याकरिता शहरातील विविध भागात कंपोस्ट टाक्या (पिट) लावण्यात आले असून यामधून दरमहा ६ ते ७ टन खताची निर्मिती होणार आहे. सदर खत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णयही नगरपालिकाने ...

ठळक मुद्देवाशिम शहरात दररोज सकाळी व संध्याकाळी घंटागाडयांव्दारे ओला व सुक्या कचºयाचे संकलन केल्या जाते.ओल्या कचºयापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा निर्णय नगरपरिषद अध्यक्ष अशोक हेडा व मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी घेतला. ४० दिवसानंतर खत तयार झाल्यानंतर याचा वापर करण्यात येणार आहे.

- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शहरातील बगिच्यांना, नगरपरिषद क्षेत्रातील झाडांना देण्यासाठी नगरपालिका शहरातून गोळा करीत असलेल्या कचऱ्यातून स्वत: कंपोस्ट खत तयार करीत आहे. याकरिता शहरातील विविध भागात कंपोस्ट टाक्या (पिट) लावण्यात आले असून यामधून दरमहा ६ ते ७ टन खताची निर्मिती होणार आहे. सदर खत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णयही नगरपालिकाने घेतला आहे.वाशिम शहरात दररोज सकाळी व संध्याकाळी घंटागाडयांव्दारे ओला व सुक्या कचºयाचे संकलन केल्या जाते.  ओल्या कचºयापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा निर्णय नगरपरिषद अध्यक्ष अशोक हेडा व मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी घेतला व प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात आली. यासाठी  ३ बाय १२ आकाराचे १०  कंपोस्ट खत आर्टिफिशियल कंपोस्ट पिट (टाक्या) तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये कंपोस्ट खत तयार करण्यास सुरुवात ही करण्यात आली आहे. ४० दिवसानंतर खत तयार झाल्यानंतर याचा वापर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नगरपालिकेच्यावतिने आर्टिफिशीयल कंपोस्ट पिट तयार करण्यात आल्या असल्या तरी शहरातील डंम्पींग गार्डनवर कायमस्वरुपी पीट तयार करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात हे तयार होणार आहे.  आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या देखरेखीखाली हे कंपोस्ट खत नियोजनबध्द तयार करण्यात येत असून या उपक्रमाचे शहरवासियांतून कौतूक केल्या जात आहे.शेतकऱ्यांना मिळणार खतवाशिम शहरातील ओल्या कचºयापासून निर्माण होणाऱ्या खताचे प्रमाण जास्त असल्याने सदर खत ज्या शेतकºयांना लागेल त्यांना अल्पदरात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे.

वाशिम शहरात घंटागाडयांव्दारे संकलीत करण्यात येत असलेला ओला व सुका कचरा नागरिकांनी वेगवेगळा टाकावा. यामुळे कंपोस्ट खत तयार करण्यास मदत होईल-गणेश शेटे, मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम

शहरवासियांनी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद करावे तसेच संकलीत करण्यात येत असलेल्या कचºयामध्ये प्लास्टिक पिशव्या टाकू नये.-अशोक हेडा, नगराध्यक्ष, नगरपरिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका