शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत बंद’ला वाशिम जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 17:41 IST

पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅससह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे.

वाशिम  - पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅससह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे जीवन विस्कळित झाले आहे. हा मुद्दा समोर करून काँग्रेससह अन्य काही राजकीय पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली. त्यास वाशिम जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहीठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सकाळपासून बंद असलेली व्यावसायिक प्रतिष्ठाने दुपारी १२ वाजतानंतर खुली झाली. बंददरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.वाशिम जिल्ह्यात काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, पिरीपा आदी राजकीय पक्षांनी बंद पुकारून जिल्ह्यातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत सोमवारी सकाळपासून दुपारी १२ वाजतापर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर मात्र बहुतांश दुकाने सुरू करण्यात आली. यादरम्यान पेट्रोलपंप, शाळा-महाविद्यालयांनीही बंदमध्ये सहभाग नोंदविला. एस.टी.सह अन्य वाहतूकीवर मात्र या बंदचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही. दिग्गज पदाधिकारी उतरले रस्त्यावर!सर्वसामान्य जनतेला असह्य होणा-या महागाईच्या विरोधात आवाज उठवून काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी बंद पुकारला. यादरम्यान काँग्रेसमधील दिग्गज पदाधिकारी चक्क रस्त्यावर उतरल्याचा अनुभव लोकांनी घेतला. त्यात प्रामुख्याने रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित झनक यांच्यासह आजी-माजी पदाधिका-यांचा समावेश होता. यावेळी प्रत्येक शहरात फिरून ध्वनिक्षेपकाव्दारे व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदwashimवाशिम