शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचे निर्जंतुकीकरण पूर्ण; शासन निर्देशांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 11:57 IST

१ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होतील की नाही याबाबत शिक्षकांसह पालकांमध्ये चर्चा झडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छता पूर्ण झाली असून, १ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होतील की नाही याबाबत शिक्षकांसह पालकांमध्ये चर्चा झडत आहेत.कोरोना विषाणू संसर्गाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. ३१ आॅगस्टपर्यंत कोणतेही वर्ग सुरू करू नये, असे स्पष्ट निर्देश केंद्र व राज्य शासनाचे आहेत. तत्पूर्वी सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करून शिक्षण विभाग १ सप्टेंबरसाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जिल्हा परिषद ७७५ शाळा असून, यापैकी ३५० च्या आसपास शाळा ‘क्वारंटीन’साठी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात या शाळा स्थानिक प्रशासनाने मुख्याध्यापकांच्या ताब्यात दिल्या. त्यानंतर ३५० शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करून शाळेचे प्रशासकीय कामकाज सुरू करण्यात आले. सध्या प्रशासकीय कामकाजासाठी शाळा मात्र सुरू आहेत, मात्र कोणतेही वर्ग सुरू नाहीत. या शाळेत अतिजोखीम गटातील जसे मधुमेह, उ्च्चदाब आजारी शिक्षक, महिला शिक्षकांना शक्यतोवर बोलाविण्यात येऊ नये, अत्यावश्यक असेल तरच या गटातील शिक्षकांना बोलाविण्यात यावे, कोणत्या शिक्षकाला कोणत्या दिवशी शाळेत बोलवायचे याचा निर्णय मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आलेला आहे. दरम्यान, आता हळूहळू ‘अनलॉक’ ची प्रक्रिया सुरू असून, आंतरजिल्हा बससेवा, दुकाने सुरू करण्याच्या वेळाही वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे १ सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होतात की नाही, वर्ग सुरू करण्याबाबत शासनाचे नेमके कोणते धोरण राहिल, याबाबत शिक्षक व पालकांमध्ये चर्चा रंगली.जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तुर्तास तरी पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करू नयेत. वर्ग सुरू करायचे असतील तर संबंधित शाळांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.- डॉ. विठ्ठल गोटे,पालक, वाशिमकोरोनामुळे वर्ग सुरू करताना आवश्यक ती खबरदारी शाळांना घ्यावी लागणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटाईजची व्यवस्था, मध्यान्ह भोजन व्यवस्था या सर्व बाबींचा विचार करूनच वर्ग सुरू करावे.- मिलिंद गायकवाड,पालक, वाशिम३१ आॅगस्टपर्यंत वर्ग सुरू न करण्याच्या सूचना आहेत. १ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होणार की नाही याबाबत सध्यातरी स्पष्टता नाही. तत्पूर्वी जि.प. शाळांचे निर्जंतुकीकरण करून शिक्षक सज्ज आहेत. शासनाचा निर्णय मान्य राहिल.- सतीश सांगळे,शिक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा