शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

न उगवलेल्या बियाण्यांचा मोबदला प्रलंबीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 16:03 IST

काही कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल केले असले तरी, उर्वरित कंपन्यांवरील कारवाई शुन्यच आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्यात यंदाच्या हंगामात लाखावर शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला. त्यांना दुबार पेरणी करावी लागली. कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना तातडीने बियाणे बदलून देण्याचे आदेशही दिले. तथापि, तीन महिने उलटले असतानाही हजारो शेतकºयांना बियाणे बदलून मिळाले नाही किंवा मोबदलाही मिळालेला नाही. त्यातच काही कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल केले असले तरी, उर्वरित कंपन्यांवरील कारवाई शुन्यच आहे.यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या घटना राज्यभरात घडल्या. त्यामुळे लाखो शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे त्यांचे परिश्रम आणि खर्चात वाढ झालीच. शिवाय दुबार, तिबार पेरणीत वेळ गेल्याने उत्पादनावरही परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात न उगवलेल्या बियाण्यांच्या प्रकाराची दखल कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली आणि पंचनाम्यांच्या अहवालाची प्रतीक्षा न करता शेतकºयांना तात्काळ बियाणे बदलून पेरणी सोयीची करण्याचे आदेश दिले. तथापि, राज्यभरात कृषी विभागाने शेतकºयांच्या तक्रारीनुसार पंचनाम्यांचे सोपस्कार सुरूच ठेवले. त्यात काही कंपन्यांवर कोर्ट केसेस (न्यायालयीन खटले) दाखल केले आहेत. आता त्याचा निकाल लागण्यास बराच विलंब लागणार आहे. शिवाय उर्वरित हजारो शेतकºयांना अद्याप कंपनीकडून बदली बियाणेही देण्यात आलेले नाहीत आणि खरीप हंगाम संपत आला असताना शेतकºयांना बियाण्यांचा खर्च म्हणून मोबदलाही मिळालेला नाही. राज्यशासनाने या प्रकाराची दखल घेऊन शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी राज्यभरातील शेतकरी करीत आहेत.

काजळेश्वर परिसरात यंदा ४० पेक्षा अधिक शेतकºयांना निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला. त्यामुळे त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. काही ठिकाणी कृषी विभागाने पंचनामेसुद्धा केले; परंतु आता सोयाबीन काढणीवर आले असताना शेतकºयांना बदली बियाणे मिळाले नाहीत किंवा संबंधित कंपनीकडून मोबदलाही मिळू शकला नाही.-नितिन उपाध्ये,शेतकरी, काजळेश्वर ता. कारंजा

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती