शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 17:25 IST

Washim News अनुकंपाधारकांनी २४ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.

वाशिम : प्रचलित शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच शिक्षण संस्थेतील रिक्त जागांवर तात्काळ सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी अनुकंपाधारकांनी २४ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.शासन सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या एका वारसाला नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र या धोरणाला प्रशासनाकडून हरताळ फासल्या जात असल्याने अनुकंपा पदभरती करण्यास दिरंगाई होत आहे. प्रचलित शासन निर्णयानुसार रिक्त पदांच्या २० टक्के पदे अनुकंपाची भरणे आवश्यक असताना प्रशासन मात्र भरती करण्यास दिरंगाई करत आहे, असा आरोप करीत अनुकंपाधारकांनी २४ जानेवारीपासून वाशिम येथे उपोषणाला सुरूवात केली. नोकरीत सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारक संघातर्फे यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्य विभाग प्रमुखांना निवेदन  दिले; आंदोलनही केले. परंतू, अद्याप हा प्रश्न निकाली निघाला नाही. याकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी अनुकंपाधारक संघाचे प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष किशोर अवचार यांच्या नेतृत्वात २४ जानेवारीपासून अनुकंपाधारकांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. या आंदोलनात अभिजीत निंबेकर, योगेश राठोड, प्रफुल इंगोले, सतीश भेंडेकर, रवि गाडे, ठाकरे इलियास खान, पुरुषोत्तम जाधव, भारत साबळे, बांगरे आदींचा सहभाग आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद