शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 15:24 IST

सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना मुख्यालयी राहण्याचे आदेशात नमूद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये या उद्देशाने सहकार्य करण्यासाठी सर्व गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २५ मार्च रोजी दिला. या समितीमध्ये ग्रामस्तरीय अधिकाºयांचा समावेश असून त्यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना मुख्यालयी राहण्याचे आदेशात नमूद आहे.राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात या विषाणूच्या प्रसाराला तत्काळ प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीमध्ये तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावात राहणारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य यांचा समावेश असून पोलीस पाटील हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.समितीने अत्यावश्यक कामाशिवाय गावातून कोणीही बाहेर जाणार नाही, यावर लक्ष ठेवावे. यासह पुणे, मुंबई यासारख्या महानगरातून गावात आलेल्या लोकांची नजीकच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. याशिवाय या सर्व लोकांना किमान १५ दिवसांसाठी त्यांच्या राहत्या घरी विलगीकरण करून ठेवण्याची जबाबदारी या समितीवर राहणार आहे. विलगीकरण करण्यास नकार दिल्यास अशा व्यक्तींची नावे तहसील कार्यालयास सादर करावी लागणार आहेत. गावात अत्यावश्यक सेवा जसे, किराणा माल, अन्नधान्य दुकाने, पिण्याचे पाणी, मेडिकल, डॉक्टरचे दवाखाने चालू राहतील याची खात्री करावी, असा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला.गावस्तरीय या समितीने भाजीपाला, फळे घरपोच देण्यासाठी नियोजन करावे. जीवनावश्यक वस्तू वगळता पानठेला, कोल्ड्रिंक्स, आयस्क्रीमची दुकाने, केशकर्तनालय (सलून) बंद ठेवावीत. सर्व राशन दुकाने सुरु ठेवावीत. दुध डेअरीवर गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर ठेवून लोकांना दुध उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. अत्यावश्यक सेवांच्या सर्व ठिकाणांवर हात धुण्याची व्यवस्था करावी. गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून त्यांचे निजंर्तुकीकरण करून घ्यावे. तसेच समितीवर सोपविलेल्या सर्व कामे सुरु करून तसा अहवाल तहसीलदार कार्यालयास सादर करावा, असे आदेशात नमूद आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwashimवाशिमsarpanchसरपंच