शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या मतदारांना रंगीत ओळखपत्र; पहिल्या टप्प्यातील ओळखपत्रांचे वितरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 15:29 IST

वाशिम: मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत  जिल्ह्यात ३७ हजार ४३४ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, १३७५ मयत किंवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत  जिल्ह्यात ३७ हजार ४३४ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, १३७५ मयत किंवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. निवडणूक विभागाकडून आता रंगीत मतदान ओळख पत्र प्रकाशित करण्यात आले आहेत. यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ओळखपत्रांचे मतदारांना वितरणही करण्यात आले आहे.  निवडणूक आयोगाच्या निदेर्शाप्रमाणे १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणीची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदारांच्या नावात बदल, पत्त्यात दुरुस्ती, स्थलांतरासंबंधी मतदारांकडून नमुना अर्ज भरून घेणे तसेच मयत मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे काम करण्यात आले. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी मतदारांकडून नमुना क्र.६ चा अर्ज भरून घेण्यात आला. मतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यातील वाशिम - मंगरुळपीर, रिसोड -मालेगाव आणि कारंजा -मानोरा या तिन्ही विधानसभा मतदारसंघात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ३७ हजार ४३४ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्यानंतर आता या मतदारांच्या ओळखपत्रांची छपाई राज्यस्तरावर करण्यात आली असून, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या मतदान ओळखपत्रांचे वितरण नवमतदारांना करण्यात आले आहे.  

मतदारसंघनिहाय अशी आहे नवीन मतदारांची नोंदणी!मतदारसंघ                                        मतदारवाशिम - मंगरूळपीर                     १२, ४७४रिसोड - मालेगाव                          ११, ६७०कारंजा -मानोरा                           १३,२९०....................................................................जिल्हयात                                ३७४३४ नवे मतदार 

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूक