शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी पोहचले बांधावर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:14 IST

जिल्हाधिकाºयांनी प्रत्यक्ष बांधावर पोहचून पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यातील त्रुटीमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी नुकसानाचे पंचनामे गुणवत्तापूर्ण होतील, याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी मंगळवारी दिल्या. वाशिम तालुक्यातील सुराळा, कोंडाळा झामरे शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची जिल्हाधिकाºयांनी प्रत्यक्ष बांधावर पोहचून पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला. पंचनामे अचूक होण्याच्या दृष्टीने त्यांनी यावेळी झालेल्या काही पंचानाम्यांची पडताळणी देखील केली.जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे गतीने पूर्ण करावेत. याकरिता तालुकास्तरीय अधिकारी व ग्रामस्तरीय अधिकाºयांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. तसेच पंचनामे करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नुकसानग्रस्त पिकाची भरपाई शेतकºयास मिळावी, यासाठी सर्व पंचनामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. सुराळा शिवारातील विठ्ठल चौधरी यांच्या शेतातील कापणी केलेले सोयाबीन, गोपाल चौधरी यांच्या शेतातील कापूस पिकासह इतर शेतकºयांच्या शेतांमधील कापणी झालेल्या व शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी जिल्हाधिकारी मोडक यांनी केली. तसेच कोंडाळा झामरे शिवारातील नुकसानग्रस्त पिकांचाही पाहणी करण्यात आली.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी