शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फळपीक विमाधारकांच्या माहितीचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 14:54 IST

वाशिम: जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये आंबिया बहारातील संत्रा, डाळिंब, आंबा व लिंबू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये आंबिया बहारातील संत्रा, डाळिंब, आंबा व लिंबू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. यापैकी संत्रा, डाळींब व लिंबू पिकासाठी किती शेतकºयांनी विमा उतरविला, याची माहिती कृषी विभागाकडून संकलीत केली जात आहे. बँकांकडून दिरंगाई होत असल्याने अद्याप माहितीचे संकलन होऊ शकले नाही, असे सूत्रांनी सांगितले.आंबिया बहारातील संत्रा फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील पाच, रिसोड तालुक्यातील चार,  मालेगाव तालुक्यातील सात,  मंगरूळपीर तालुक्यातील सहा, मानोरा तालुक्यातील चार तसेच कारंजा तालुक्यातील सहा अशा महसूल मंडळांचा समावेश आहे. संत्रा पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर होती.डाळींब या फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील चार, मालेगाव तालुक्यातील एक, मंगरूळपीर तालुक्यातील सहा आणि मानोरा तालुक्यातील एका महसूल मंडळांचा समावेश होता. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ आॅक्टोबर होती. आंबिया बहार लिंबूसाठी वाशिम तालुक्यातील एकमेव पार्डी टकमोर  या महसूल मंडळाचा समावेश होता. लिंबू पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ नोव्हेंबर होती. डाळींब तसेच लिंबू या पिकांसाठीची मुदत संपून १५ पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी संपला आहे. तथापि, बँकांकडून माहिती येण्यास विलंब होत असल्याने अद्याप माहितीचे संकलन झाले नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.  आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदतआंबा या पिकाकरीता वाशिम तालुक्यातील केकतउमरा, राजगाव, मानोरा तालुक्यातील मानोरा या महसूल मंडळांचा समवेश विमा योजनेत करण्यात आला आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर १ लाख २१ हजार रुपये विमा संरक्षण मिळणार असून याकरिता ६ हजार ५० रुपये विमा हप्ता शेतकºयांनी भरावयाचा आहे. आंबा पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती